क्षमता वाढवण्यात आलेल्या कचरा विल्हेवाट प्रकल्पाचे उदघाट्न

.
साळगाव कळंगुट पठारावरील या कचरा विल्हेवाट प्रकल्पात विविध पंचायतीतून येणारे कचऱ्याचे प्रमाण वाढल्याने या प्रकल्पाची क्षमता वाढवण्याची गरज पडली, म्हणूनच या प्रकल्पाची क्षमता दिवसाला 100 टन प्रतिदिनावरून 250 टन प्रतिदिन वर करण्यात आली आहे अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी दिली.
         क्षमता वाढवण्यात आलेल्या कचरा विल्हेवाट प्रकल्पाचे उदघाट्न केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर गोव्याचे मुख्य सचिव परिमल राय, घनकचरा व्यवस्थापन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक लेवीन्सन मार्टिन्स, गोवा साधन सुविधा विकास महामंडळाचे हरीश अडकोणकर, गोवा प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अध्यक्ष गणेश शेटगावकर, नाबार्ड चे अधिकारी विजय देशपांडे, जिल्हा पंचायत सदस्य दत्तप्रसाद दाभोळकर, कळंगुट सरपंच शॉन मार्टिन्स, कांदोळी सरपंच ब्लेझ फर्नांडीस, पिळर्ण सरपंच संदीप बांदोडकर,  सुहास मेहता, संदीप असोलकर उपस्थित होते.
          हा वाढवण्यात आलेल्या क्षमतेचा प्रकल्प उभारण्यासाठी नाबार्ड ने सहकार्य केले. नाबार्ड ने या प्रकल्प उभारणीकरिता 104 करोड चे अर्थसहाय्य्य केल्याने एक वर्षाच्या विक्रमीवेळेत सुरू करता आला असे मंत्री लोबो यांनी सांगितले.
     सुरवातीला लेवीन्सन मार्टिन्स यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी उपस्थितांनी नवीन प्रकल्पाची पहाणी केली.
     फोटो…… क्षमता वाढवण्यात आलेल्या कचरा विल्हेवाट प्रकल्पाचे उदघाट्न करताना घनकचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो, सोबत मुख्य सचिव पिरामल राय व इतर मान्यवर…….. ( रमेश नाईक )

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar