पर्रा सिटीझन असोसिएशन तर्फे 23 डिसें.2021 रोजी अखिल गोवा पातळीवर कॅरेल सिंगिंग स्पर्धा

.

म्हापसा  दि.21 ( प्रतिनिधी )

      पर्रा सिटीझन असोसिएशन तर्फे 23 डिसें.2021 रोजी अखिल गोवा पातळीवर कॅरेल सिंगिंग स्पर्धा तसेच कळंगुट व शिवोली मतदारसंघ मर्यादित “फेस्टिवल ऑफ स्टार ” अर्थात चांदणी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती कळंगुट चे आमदार तथा घनकचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी दिली.
         पर्रा येथील निवास्थानी घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेला त्यांच्यासोबत पर्राच्या सरपंच डिलायला लोबो, पर्रा सिटीझन फोरमचे पदाधिकारी,  कळंगुट व शिवोली मतदार संघातील पंचायतीचे सरपंच, उपसरपंच व पंचसदस्य उपस्थित होते.
         निवडणुकीची आचार संहिता कधीही लागण्याची शक्यता असल्याने यंदा स्पर्धा न घेण्याचे ठरवले होते पण असोसिएशन च्या पदाधिकाऱ्यांनी स्पर्धा घेण्याचे ठरवल्याने ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेतील सर्व सहभागीना प्रवासखर्च देण्यात येईल असे मंत्री लोबो यांनी सांगितले.
     कॅरेल सिंगिंग स्पर्धा दहा गटात घेण्यात येणार असून प्रत्येक गटात दहा स्पर्धक असावेत. या स्पर्धेत सहभागाकरिता दि.22 डिसें. पर्यत नोंदणी आवश्यक आहे तर स्टार फेस्टिवल साठी दि.23 डिसें रोजी सायं.4 वाजेपर्यंत नोंदणी करता येईल, अशी माहिती पर्रा सिटीझन असोसिएशन चे पदाधिकारी पालकर यांनी दिली.
   फोटो…… पर्रा येथे घेण्यात येणाऱ्या कॅरेल सिंगिंग व फेस्टिवल ऑफ स्टार स्पर्धेची माहिती देताना मंत्री मायकल लोबो, सोबत डिलायला लोबो व इतर मान्यवर…….. ( रमेश नाईक )

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar