कायसूव बादे, आसगाव येथील शापोरा नदी पात्रात खुबे काढतांना शेकडो नागरिक

.
म्हापसा  दि. 21  ( प्रतिनिधी )

      सुमारे सहा वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर कायसूव आसगाव बादे येथील शापोरा नदीत खुबे मिळाल्यामुळे येथील तसेच शिवोली येथील शेकडो नागरिकांनी खुबे काढण्यासाठी नदीकडे धाव घेतली.
     अधीक माहितीनुसार गेल्या काही वर्षात येथील नदीपात्रातील खुबे, तिसऱ्या व शीनाण्या यांचे अस्थीत्व नाहीसे झाले होते, येथील रुचकर अश्या या समुद्र जीवांना चांगली मागणी होती, पण येथील अस्थीत्व नष्ट झाल्याने खुबे, तिसऱ्या,  शिनाण्या बाजारात मिळण्याचे प्रमाण कमी झाले.सुमारे सहा वर्षाच्या कालावधीनंतर पुन्हा रुचकर खुबे चाखण्यास मिळाल्याचा आनंद येथील लोकांना झाला.
       शापोरा बोट मालक संघटनेचे अध्यक्ष बलभीम मालवणकर यांच्या प्रयत्नामुळे या ठिकाणी खुबे उपलब्ध झाले अशी माहिती हणजूण कायसूव जैव विविधता समितीचे अध्यक्ष मायकल डिसोझा यांनी दिली. त्यांनी दिलेल्या माहिती नुसार या समितीचे स्वीकृत सदस्य असलेल्या मालवणकर यांनी समितीच्या सहकार्याने खुबे सवंधनाचाकार्यक्रम करण्याचे ठरवले होते पण कोवीड महामारीमुळे कार्यक्रम करता आला नाही, त्यामुळे बलभीम मालवणकर यांनी बेळगाव येथून एक पोते भरून आणलेला खुब्यांचा बारीक जीव या नदीपात्रात सर्वत्र पसरून टाकला. कालांतराने त्यांची उत्पत्ती वाढल्याने येथे खुबे मिळण्याचे प्रमाण वाढल्याचे मायकल डिसोझा यांनी सांगितले.
     फोटो…… कायसूव बादे, आसगाव येथील शापोरा नदी पात्रात खुबे काढतांना शेकडो नागरिक…… ( रमेश नाईक )

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar