म्हापसा दि. 22 ( प्रतिनिधी )
राज्यात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यावर बंदी असताना गोव्यात तसेच हणजूण पोलीस स्थानक क्षेत्रात अश्या तंबाखूजन्य पदार्थाची व सिगारेट्स ची खुलेआम विक्री होत आहे, तसेच विक्री ठिकाणावर कोणतेही सूचना फलक लावण्यात आलेले दिसत नाहीत आणी त्यावर काही कारवाई होत नसल्यामुळे असले तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणारे छोटे छोटे बेकायदा गाडे जागोजागी नजरेस पडतात.
गोव्यात बऱ्याच ठिकाणी सिगारेट्स ची विक्री होते, सिगरेट चा वापर आरोग्यास हानिकारक आहे असा इशारा सिगारेट्स च्या पाकिटावर दिलेला असतानाही सिगारेट्स सर्रास पणे ओढल्या जातात, काही पर्यटक समुद्र किनाऱ्यावर खुल्या सार्वजनिक जागेत सिगरेट्स पिताना आढळतात. पोलीस फक्त सनबर्न सारख्या संगीत महोत्सवावेळी कोटपा कायद्याअंतर्गत कारवाई करतात पण त्यानंतर काहीच नाही.
तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणारे गोमंतकीयकापेक्षा बिगर गोमंतकीयच जास्त आढळतात. राज्यात गुटखा विक्री विक्रीवर बंदी असताना छुपेपणे गुटखा विक्री होत असते, पण उघडपणे तशाच प्रकारच्या पुड्या गाड्यावर लटकट असतात. अश्या गाड्यावर सकाळच्या वेळी व सायंकाळी गोव्याबाहेरचे मजूर गर्दी करून असतात.गोव्याबाहेरील मजूरच अश्या तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन मोठ्या प्रमाणात करीत असल्याने बहुतेक दुकानातूनही असल्यापुड्या विकल्या जात असल्याचे स्थानिक सांगतात.
फोटो….. हणजूण येथे खुलेपणाने विकण्यासाठी ठेवलेली सिगारेट्स व तंबाखूजन्य पदार्थाच्या लोंबकळणाऱ्या पुड्या…….. ( रमेश नाईक )