म्हापसा येथे देवस्थान पदाधिकारी संमेलनात बोलताना भाजप चे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा

.

म्हापसा  दि. 22  ( प्रतिनिधी )

       भारतीय जनता पक्षाचे केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सर्व धार्मियांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहे, इतर पक्षानी समाजाला जाती धर्माच्या आधारवर विभागले आणि त्याचा राजकीय फायदा करून घेतला पण भाजपा सरकार सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास व सबका प्रयास या तत्वावर चाललेले आहे असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी म्हापसा येथे केले.
       म्हापसा येथे देवस्थान पदाधिकारी संमेलनात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गोवा भाजपा प्रदेश अध्यक्ष सदानंद शेटतानावडे, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, खासदार विनय तेंडुलकर, माजी खासदार नरेंद्र सावयीकर, सभापती राजेश पाटणेकर,आमदार निळकंठ हळर्णकर, दयानंद सोपटे, माजी मंत्री दयानंद मांद्रेकर उपस्थित होते.
        पुढे बोलताना नड्डा यांनी सांगितले कि भारतीय जनता पक्षाचा कोणताही नेता कोणत्याही राजकीय परिवारातून आलेला नाही पण इतर पक्षातील नेते वंशवादातून आलेले आहेत. मोदींच्या प्रयत्नामुळेच भारतात करोनाच्या दोन लशी लगेच तयार करण्यात आल्या नाहीतर या अगोदर इतर लशिंकरीता भारताला दुसऱ्या देशावर अवलंबून रहावे लागले होते. या लशींना सुरवातीला विरोध करणारेच आता लशी चा पुरवठा करण्याची मागणी करीत आहेत. जनतेच्या आशिर्वादावर असलेला पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष असल्याचे अध्यक्ष नड्डा यांनी सांगितले.
         भारतीय जनता पक्षाचे सरकार पुढील काळात गोव्यात अध्यात्मिक पर्यटनाला विकसित करून पर्यटकांना गावागावातील धार्मिक स्थळांचे दर्शन घडवणार, तसेच गोव्यातील भजन कीर्तनची परंपरा पुढे तशीच सुरु रहावी व पुढील गावातील पिढीला त्यांचे ज्ञान मिळावे म्हणून शाळातील संगीत शिक्षकांना देवस्थानाकडे जोडून देण्याचा सरकारचा विचार आहे असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी बोलताना सांगितले.
       या वेळी गोवा भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेटतानावडे, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनीही आपले विचार मांडले. सुरवातीला दयानंद सोपटे यांनी सर्वांचे स्वागत केले तर किशोर अस्नोडकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसचलन केले व त्यांनीच आभार मानले.
     फोटो ………  म्हापसा येथे देवस्थान पदाधिकारी संमेलनात बोलताना भाजप चे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, सोबत व्यासपीठावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व इतर मान्यवर…….. ( रमेश नाईक )

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें