*२५ डिसेंबरला आणि ख्रिस्ती नववर्षाच्या निमित्ताने ३१ डिसेंबरच्या दिवशी होणार्‍या सर्व प्रकारच्या सार्वजनिक साजरीकरणावर (‘सेलिब्रेशन’वर) आणि फटाके फोडण्यावर बंदी घालावी*

.

 

दिनांक : २२.१२.२०२१

_*हिंदु जनजागृती समितीची डिचोली येथील उपजिल्हाधिकार्‍यांकडे मागणी*_

*२५ डिसेंबरला आणि ख्रिस्ती नववर्षाच्या निमित्ताने ३१ डिसेंबरच्या दिवशी होणार्‍या सर्व प्रकारच्या सार्वजनिक साजरीकरणावर (‘सेलिब्रेशन’वर) आणि फटाके फोडण्यावर बंदी घालावी*

डिचोली, २२ डिसेंबर – गेली दोन वर्षे कोरोना महामारीने देशभरात कहर केला आहे. ‘ओमीक्राँन’ नावाच्या कोरोनाच्या नवा ‘व्हेरीयंट’मुळे पुन्हा जगभरात कोरोनाची लाट येण्याची शक्यता आहे. फटाके फोडल्याने प्रदूषण होऊन मोठ्या प्रमाणात श्‍वसनाचे त्रास वाढतात. अशा वेळी २५ डिसेंबर पासून ३१ डिसेंबरपर्यंत मोठ्या प्रमाणात पार्ट्या होतात, याद्वारे कोरोनाचा संसर्ग पसरण्याची शक्यताही अधिक आहे. या काळात सार्वजनिक आरोग्य धोक्यात घालणे परवडणारे नाही. त्यामुळे ख्रिसमसनिमित्त २५ डिसेंबरला आणि ख्रिस्ती नववर्षाच्या निमित्ताने ३१ डिसेंबरच्या दिवशी होणार्‍या सर्व प्रकारच्या सार्वजनिक साजरीकरणावर (‘सेलिब्रेशन’वर) आणि फटाके फोडण्यावर बंदी घालावी. राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळे, गड-किल्ले, ऐतिहासिक स्थळे आदी सार्वजनिक ठिकाणांवर मद्यपान-धूम्रपान अन् पार्ट्या करण्यावर प्रतिबंध आणावा. पोलिसांची गस्तीपथके नेमून याचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने डिचोली येथील उपजिल्हाधिकारी श्री. दीपक वायंगणकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळामध्ये हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री गोविंद चोडणकर, बाबाजी कानोळकर आणि सनातन संस्थेचे अरुण हळदणकर यांची उपस्थिती होती.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की, ३१ डिसेंबरच्या रात्री मोठ्या प्रमाणात धूम्रपान, मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन आदी केले जाते, तसेच या रात्री मद्यपान करून भरधाव वाहने चालवल्याने अपघातही होत आहेत. रात्रभर मोठ्या आवाजाचे फटाके उडवून प्रदूषण करणे, तसेच कर्णकर्कश ध्वनीवर्धक लावणे, अश्‍लील अंगविक्षेप करून नाचणे, शिवीगाळ करणे, मुलींची छेडछाड-विनयभंग-बलात्कार आदी कुकृत्ये करून एकूणच कायदा अन् सुव्यवस्था यांच्या दृष्टीने गंभीर स्थिती निर्माण होत आहे. त्याचा अतिरिक्त ताण पोलीस आणि प्रशासन यांवर येतो. तसेच यामुळे देशाची युवापिढी नैतिकदृष्ट्या उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.

*‘ओल्ड मॅन’ प्रथेच्या निमित्ताने होणारे गैरप्रकार रोखण्यासंबंधी*
गोव्यात ३१ डिसेंबर या दिवशी पाळण्यात येणार्‍या ‘ओल्ड मॅन’प्रथेच्या निमित्ताने रस्त्यावरील वाहनचालकांना अडवून त्यांच्याकडून खंडणी घेणे, ध्वनीप्रदूषण करणे, छेडछाड करणे, प्रतिमा रस्त्यावरच जाळणे, दारू पिऊन धिंगाणा घालणे, भांडणे करणे आदी गैरप्रकार होत असल्याचे मागील काही वर्षांपासून निदर्शनास आले आहे. या गैरप्रकारांच्या विरोधात जनप्रबोधन करून त्याला आळा घालावा, अशी मागणी आहे.

*आपला नम्र,*
*डॉ. मनोज सोलंकी, राज्य समन्वयक*
*हिंदु जनजागृती समिती*
संपर्क : ९३२६१०३२७८

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar