.

 

*सनातनवरील आरोप खोटे आणि राजकीय हेतूने प्रेरित !* – सनातन संस्था

राज्याचे पर्यावरणमंत्री मा. आदित्यजी ठाकरे यांना मिळालेल्या धमक्यांचा सनातन संस्था तीव्र शब्दांत निषेध करते. या धमक्या देणार्‍या दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी आम्ही करत आहोत; परंतु या चर्चेत कोणताही संदर्भ नसतांना आणि जी प्रकरणे अगोदरच न्यायप्रविष्ट आहेत, त्या संदर्भात महाराष्ट्राचे मंत्रीद्वयी नवाब मलिक आणि छगन भुजबळ यांनी विनाकारण सनातन संस्थेवर आरोप केले आहेत. त्यांचे सदर आरोप खोटे, तसेच राजकीय हेतूने प्रेरित आहेत. याद्वारे एका हिंदुत्ववादी संस्थेला पर्यायाने हिंदुत्वाला बदनाम करण्याचा हेतू दिसून येतो.

कोरोना महामारीच्या काळात निर्बंध असतांनाही हजारो लोकांचे मोर्चे काढून रजा अकादमीने केलेल्या दंगलीत महाराष्ट्र पेटला होता, त्यावर कारवाईची मागणी न करता; जितेंद्र नारायणसिंह त्यागी (पूर्वाश्रमीचे वसीम रिजवी) यांचा शिरच्छेद करण्याची उघड धमकी देणार्‍या काँग्रेसच्या नेत्यांच्या विरोधात न बोलता, कोणत्याही पुराव्याशिवाय सनातनवर देशव्यापी बंदी घालण्याची छगन भुजबळ यांची मागणी करत आहेत. हे म्हणजे ‘कॉल द डॉग मॅड अ‍ॅण्ड शूट हिम’ या इंग्रजी म्हणीप्रमाणे हिंदुविरोधी शक्ती सनातनला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचा आम्ही निषेध करतो.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar