जलस्रोत खात्यामार्फत बांधण्यात येत असलेल्या बांधा च्या कामाचा शुभारंभ करताना मंत्री मायकल लोबो,

.

म्हापसा  दि. 23  ( प्रतिनिधी )

     गोव्या  बाहेरून पक्ष फक्त मोठ मोठी आश्वासने देऊ शकतात, गोव्याची अस्मिता व संस्कृती टिकवण्याचे काम गोव्यातील प्रमुख पक्षच करू शकतात म्हणून या बाहेरून आलेल्या पक्षात गेलेल्या नेत्यांनी सारासार विचार करून परत माघारी फिरावे असे आवाहन बंदर कप्तान मंत्री मायकल लोबो यांनी केले.
     नेरूल पूल ते काकुलो हाऊस, कांदोळी पर्यत बांध बांधकामाचा शुभारंभ बंदर कप्तान मंत्री मायकल लोबो यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की आपण मतदार संघातील जनतेबरोबर आहे, त्यांच्या मतानुसार आपण निवडणूक लढवणार, नेत्यांनी दुसऱ्या पक्षात उड्या टाकल्या त्यांना जनता धडा शिकवणार, तत्पूर्वी त्यांनी परत फिरावे असा सल्ला मंत्री लोबो यांनी दिला.
       जलस्रोत खात्यामार्फत सुमारे 4.52 करोड खर्चून 73 मीटर लांबीच्या या बांध बांधकामच्या वेळी जिल्हा पंचायत सदस्य दत्तप्रसाद दाभोळकर, कांदोळी सरपंच ब्लेझ फर्नांडिस, व इतर पंच सदस्य तसेच जलस्रोत खात्याचे अभियंता उपस्थित होते.
   फोटो…….. जलस्रोत खात्यामार्फत बांधण्यात येत असलेल्या बांधा च्या कामाचा शुभारंभ करताना मंत्री मायकल लोबो, सोबत जिल्हा पंचायत सदस्य दत्तप्रसाद दाभोळकर, कांदोळी सरपंच ब्लेझ फर्नांडिस व इतर

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar