पर्रा सिटीझन असोसिएशन तर्फे आयोजित नक्षत्र स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस प्रदान करताना बंदर कप्तान मंत्री मायकल लोबो

.

म्हापसा  /  प्रतिनिधी

       पर्रा सिटीझन असोसिएशन तर्फे घेण्यात आलेल्या नक्षत्र स्पर्धेत कळंगुट येथील राजश्री साळगावकर यांना प्रथम क्रमांक मिळाला.
       पर्रा सिटीझन असोसिएशन तर्फे ही स्पर्धा घेण्याचे निश्चित नव्हते, आचार संहिता कधीही लागू शकते याची धास्ती होती पण चार दिवसापूर्वीच स्पर्धा घेण्याचे ठरले तरीही कळंगुट व शिवोली मतदार संघ मर्यादित या नक्षत्र स्पर्धेला चांगला प्रतिसाद लाभला. या स्पर्धेकरिता 789 स्पर्धक सहभागी झाले असे घनकचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी पारितोषिक वितरण सभारंभ प्रसंगी बोलताना सांगितले.
     यावेळी व्यासपीठावर पर्राच्या सरपंच डिलायला लोबो, इतर पंच सदस्य, कळंगुट, व शिवोली मतदार संघातील सरपंच, पंचसदस्य उपस्थित होते.
       या नक्षत्र स्पर्धेत तिसरे बक्षीस विशांत सावंत ( शिवोली ) व दुसरे बक्षीस दामोदर नाईक (शिवोली ) यांना मिळाले यावेळी दहा उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. सर्वांना रोख रक्कम व ट्रॉफी देण्यात आली.
यावेळी घेण्यात आलेल्या अखिल गोवा पातळीवरील कॅरेल सिंगिंग स्पर्धेत सेंट झेवीयर्स कॉलेज, म्हापसा यांना दुसरे बक्षीस प्राप्त झाले तर प्रथम बक्षीस कळंगुटच्या मथायस रियल ग्रुप ला मिळाले.
   फोटो…… पर्रा सिटीझन असोसिएशन तर्फे आयोजित नक्षत्र स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस प्रदान करताना बंदर कप्तान मंत्री मायकल लोबो, सोबत पर्राच्या सरपंच डिलायला लोबो व इतर मान्यवर…….. ( रमेश नाईक )

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar