आर्थिक मदत देण्याऐवजी स्वकष्टाने कमावण्याची संधी देऊ.*

.

*आर्थिक मदत देण्याऐवजी स्वकष्टाने कमावण्याची संधी देऊ.*

थोरलेभाट, डोंगरी येथे रिव्होल्युशनरी गोवन्स अध्यक्ष व सांतआंद्रे मतदार संघाचे उमेदवार वीरेश बोरकर यांनी महिलांना स्वकष्टाने कमावण्यासाठी संधी उपलब्ध करावी या हेतूने सभा आयोजित केली. या सभेला जवळपास 50 हून अधिक महिलांचा समावेश होता. महिलांना आर्थिक मदत म्हणून सरकार कडून पैसे देण्याऐवजी जर त्यांना स्वकष्टाने कमवण्याची संधी दिली तर महिला ती संधी आनंदाने स्वीकारतील याबद्दल शंका नाही असे बोरकर म्हणाले.

येणारा काळ महिलांसाठी कसा उपयोगी ठरेल यावर भाष्य करताना बोरकर यांनी विविध क्षेत्रातून महिला कशा रीतीने कमावू शकतात हे उघड करून महिलांना समजावले. अगरबत्ती बनवणे, पापड बनवणे, आटा बनवणाऱ्या यंत्रणा बद्दलचे प्रशिक्षण, दुधापासून घरात बनवल्या जाणाऱ्या वस्तू अशा कित्येक पर्यायी व्यवसाय यशस्वीरित्या कसा करावा याबद्दलचे ज्ञान महिलांना प्राप्त करून दिले.

महिलांना स्वतःच्या पायावर उभे करणे हे आरजीचे ध्येय आहे. अशा प्रकारचे महिलांसाठी उपक्रम यापुढेही प्रत्येक मतदार संघात आरजीे घडवून आणणार बोरकर‌ पुढे म्हणाले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar