पार्सेकर महाविद्यालय व कोरे मेडिकल कॉलेज,के एल इ इस्पितळ आयोजित आरोग्य शिबिराचे उदघाटन

.

हरमल प्रतिनिधी

हरमल पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या गणपत पार्सेकर महाविद्यलयाने सुपर स्पेशालिटी मोफत आरोग्य शिबीराचे सुनियोजित पध्दतीने आयोजन करून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून नागरिकांना लाभ देण्याचे उचित व उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल समाधान असल्याचे मत माजी मुख्यमंत्री तथा पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे चेअरमन लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केले.

पार्सेकर महाविद्यालय, के एल ई इस्पितळ व कोरे मेडिकल कॉलेजच्या विद्यमाने आयोजित आरोग्य शिबिराच्या उदघाटन समारंभात बोलत होते.आरोग्य विषयक समस्या निर्माण होण्याची अनेक कारणे आहेत.मात्र त्या व्याधींतून सुटका होण्यास तज्ज्ञांच्या सल्ल्याची गरज असते.के एल ई व मेडिकल कॉलेजच्या गाड्या जेव्हा हरमल भागांत दिसू लागल्या तेव्हा वातावरण बदलले व रुग्णांना उपचारांची संधी मिळाली.डोळ्यांचे विकार,मोतीबिंदू,ह्रदय उपचार,सांधेदुःखी,हाडे ठिसूळ आदी अनेक बाबतीत नागरिकांना फायदा मिळेल असे पार्सेकर यांनी नमूद केले.

ह्या आरोग्य शिबिराचा लाभ कुठलाच स्वार्थी हेतूने नसून,पुस्तकी शिक्षणाच्या पलीकडे संस्थेने सामाजिक जबाबदारी उमजून महिलांना केक बनविणे,युवकांना पोलिस भरतीत प्रशिक्षण,बँकिंग,आय ए एस,आयपीएस सारख्या परीक्षेत मार्गदर्शन आदी कार्याचा लाभ समाजाला दिला आहे.कॉलेजच्या प्रथम वर्षातील बीए व बीएस्सीच्या विध्यार्थ्यांनी अध्यपकाच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन केले आहे.भावी शिक्षकांना आत्मविश्वास महत्वाचा असून पार्सेकर महाविद्यालय ही मार्गदर्शक संस्था बनण्याचा प्रयत्न करीत आहे.जेव्हा हे शिक्षक गोव्याच्या कानाकोपऱ्यात जातील तेव्हा पार्सेकर महाविद्यालयाचे नाव व संस्कार, तुमच्यामार्फत सर्वदूर पोचवतील असे पार्सेकर यांनी व्यक्त केले. नागरिकांनी शिबिराचा लाभ घेताना चांगले सहकार्य केले तसेच गरजेनुसार कार्ड भरून दिल्यास शस्त्रक्रियासुद्धा मोफत करून दिली जाईल, असे सांगितले. यावेळी व्यासपीठावर पालयेचे सरपंच उदय गवंडी,प्राचार्य उदेश नाटेकर, प्राचार्य राज देसाई,मुखायद्यापीका स्मिता पार्सेकर,डॉ मनोज,डॉ प्रभू व डॉ शेट्टी उपस्थित होते.

के एल ई चे निष्णात डॉ मनोज:
के एल ई चे निष्णात डॉक्टर मनोज यानी माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांनी नागरिकप्रति दाखविलेली आपुलकी व घेतलेल्या परिश्रमाने आरोग्य शिबीर घेण्याची संधी दिली त्याबद्दल डॉ मनोज ह्यांनी धन्यवाद दिले.केएलईकडे विविध योजना व विमा लाभ सुविधा असून गोमंतकीय लोकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
प्राचार्य उदेश नाटेकर—-
ह्या मोफत व सुपर स्पेशालिटी शिबीर आयोजनामागचे स्फूर्तिदाते संस्थेचे चेअरमन लक्ष्मीकांत पार्सेकर हे आहेत.राज्याचे नेतृत्व केलेल्या पार्सेकर यांच्यापाशी अनेक कल्याणकारी योजना असून संस्था व कॉलेजच्या माध्यमातून तळागाळातील लोकांना लाभ देण्यात कॉलेजचे अध्यापक व विध्यार्थी हे माध्यम असून त्यांच्या विश्वासाला नेहमीच पात्र असू,असे प्राचार्य नाटेकर यांनी व्यक्त केले.प्रारंभी संस्थेचे चेअरमन तथा माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दीपप्रज्वलन केले,
सुत्रनिवेदन प्रा वैशाली नेवगी तर प्राचार्य नाटेकर यांनी आभार मानले.ह्या शिबिराचा     जणांनी लाभ घेतला.

फोटो
हरमल—पार्सेकर महाविद्यालय व कोरे मेडिकल कॉलेज,के एल इ इस्पितळ आयोजित आरोग्य शिबिराचे उदघाटन कार्यक्रमात बोलताना  चेअरमन लक्ष्मीकांत पार्सेकर, सोबत डॉ प्रभू,पालयेचे सरपंच उदय गवंडी,प्रा राज देसाई, प्रा उदेश नाटेकर,डॉ मनोज,डॉ शेट्टी, स्मिता पार्सेकर.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar