चाकोरीबद्ध शिक्षणाची वाट सोडून प्रगतीच्या नवनवीन क्षितिजाना गवसणी घालण्याची गरज

.
विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात आपला देश वेगाने पुढे जात असताना  चाकोरीबद्ध शिक्षणाची वाट सोडून प्रगतीच्या नवनवीन क्षितिजाना गवसणी घालण्याचा ध्यास युवा विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे असे उद्गार पीर्ण ग्राम सेवामंडळाचे अध्यक्ष श्री सदानंद शेट तानावडे
यानी काढले. श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालय, पीर्णच्या वार्षिक बक्षीस वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत असताना त्यांनी  विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात  शिक्षकाइतकीच पालकांची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन केले.यावेळी व्यासपीठावर पीर्ण ग्राम सेवा मंडळाचे सचिव श्री प्रकाश नाईक,तसेच सदस्य शशिकांत नाईक,प्राचार्य उमेश नाईक ,  श्री शांतादुर्गा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.राजनिता सावंत, व पालक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्री पंढरीनाथ फडते  उपस्थित होते.प्राचार्य उमेश नाईक यांनी वार्षिक अहवाल वाचन केले.विद्यार्थ्यांनी शैक्षणिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रात मिळविलेल्या उज्ज्वल यशाचे कौतुक करून
ही परंपरा वर्धिष्णू ठेवण्याचे आवाहन मंडळाचे
सचिव प्रकाश नाईक यानी केले. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक सांस्कृतिक तसेच क्रीडा क्षेत्रात विशेष नैपुण्य मिळविलेल्या साई नाईक, साईशा शेट्ये, सिंदिया नाईक, तन्वी नाईक, आकांक्षा नाईक, मंजिरी कुबल, दिव्येश परब,
अमिषा चोडणकर, गौतमी देसाई, नारायण सावळ, प्रतीक कळंगुटकर, सिद्धि नाईक, अंकुर परब, रेश्मा फडते, प्रणिता शिंदे, नेत्रा लांबार, प्रियांक सावळ, सुकन्या नाईक,सुयानी नाईक, आदर्श कोरगावकर, साईश परब, अंजनी धारगळकर,यश नाईक, महिम नाईक, विनायक नाईक, साहिल खलप, बाबली च्यारी, प्राची गावंस, शुभम सुतार, अक्षता नाईक, राणी जळगेकर, नेहा नाईक,खुशी कलंगुटकर, सगुण सावळ, रेश्मा फडते ह्या सर्व विद्यार्थ्यांना पारितोषिके तसेच प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्राध्यापक दत्ता परब यांनी कार्यक्रमाचे प्रारंभी प्रास्ताविक केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक रजनीकांत सावंत तसेच प्राध्यापिका अपूर्वा सावंत यांनी संयुक्तपणे केले. प्राध्यापिका गंधाली परब यांनी सर्वांचे आभार  मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकेतर कर्मचारी विश्वास नाईक व यशवंत साखळकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar