म्हापसा दि. 27 ( प्रतिनिधी )
विकासाच्या नावाने जैव विविधतेचा ऱ्हास केला जात आहे, ज्यांना जीव आहे ते सर्व म्हणजे मुंगी पासून हत्ती पर्यतचे प्राणी, झाडे झुडुपे, पशुपक्षी यांचा समावेश होतो. विकासाच्या नावाने झाडांची कत्तल केली जाते त्यामुळे नैसर्गिक हवा शुद्धीकरण प्रक्रिया बंद पडते आणी दिल्ली सारख्या ठिकाणी कृत्रिम रीतीने हवा शुद्धिकरणासाठी मनोरे उभारले जात आहेत, या करिता झाडे लावा व ती जगवा असे आवाहन हणजूण कायसूव जैव विविधता समितीचे अध्यक्ष मायकल डिसोझा यांनी केले.
- हणजूण येथील सिक्रेट हार्ट हायस्कुल च्या विध्यार्थ्यांसाठी समितीने झाडे लावा झाडे वाढवा या संकल्पनेवर स्पर्धा घेण्यात आली होती. नाताळच्या पार्श्वभूमीवर आयोजित हायस्कुलच्या कार्यक्रमात या स्पर्धेतील विजेत्यांना समिती तर्फे पारितोषिके प्रदान केल्यानंतर मायकल डिसोझा प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते.
यावेळी गोवा राज्य जैव विविधता मंडळाच्या सायंटिफिक अधिकारी रेश्मा केरकर, सिक्रेट हार्ट हायस्कुलचे मुख्याध्यापक सिल्व्हेस्टर डिसोझा, फादर रिबेलो, हणजूण कायसूव जैव विविधता समितीचे सदस्य रमेश नाईक, ओलीवीया फर्नांडिस, मारियो फर्नांडिस उपस्थित होते.
यावेळी जैव विविधता मंडळाच्या सायंटिफिक अधिकारी रेश्मा केरकर यांनी जैव विविधता समिती आणी त्यांचे कार्य याबद्दल उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रोझी फर्नांडिस यांनी केले तर मुख्याध्यापक सिल्व्हेस्टर डिसोझा यांनी आभार व्यक्त केले.
फोटो……. हणजूण येथील सिक्रेट हार्ट हायस्कुलातील विध्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या झाडे लावा झाडे वाचवा या संकल्पनेवर आधारित स्पर्धेतील विजेत्यांना प्रशिस्तीपत्र व बक्षीस प्रदान करताना गोवा जैव विविधता मंडळच्या रेश्मा केरकर सोबत हणजूण कायसूव जैव विविधता समितीचे अध्यक्ष मायकल लोबो, इतर मान्यवर……. ( रमेश नाईक )