काणका येथे डिलायला लोबो यांच्या प्रचारावेळी पत्रकारांकडे बोलताना मंत्री मायकल लोबो

.

म्हापसा  दि. 28  ( प्रतिनिधी )

       गोव्यातील भारतीय जनता पक्ष हा निष्ठावंत कार्यकर्त्यांचा पक्ष राहिलेला नाही, नंबर गेम साठी विजयाची खात्री देणाऱ्या नेत्यांना आयात करताना कार्यकर्त्यांना पक्षा बाहेरचा रस्ता दाखवला जात आहे.आपण करू ती पूर्व अशी वृत्ती असलेल्या पक्षाच्या दोन नेत्यामुळे पक्षाला धोका असून यातील एकाला गोव्यातून हाकलले होते. आताच गोव्यातील भाजपा पर्रीकरांचा पक्ष राहिला नसून व्यवसायिक झाला असल्याचा टोला घनकचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी लगावला.
         शिवोली मतदार संघातील संभाव्य अपक्ष उमेदवार डिलायला लोबो यांच्या  काणका येथे प्रचारादरम्यान पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की पक्ष आपणाला उमेदवारी नाकारत असल्याच्या अफवा आहेत पण त्या कितपत खऱ्या आहेत या बद्दल आपणास काही माहिती नाही, आपण अद्याप पक्षाकडे उमेदवारीची मागणी केलेली नाही, असे मंत्री लोबो यांनी सांगितले.
     काणका येथे डिलायला लोबो यांच्या प्रचारार्थ शिवोली मतदार संघातील बहुतेक सर्व पंचायतीचे सरपंच, उपसरपंच, पंचसदस्य माजी जिल्हा पंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
     फोटो……. काणका येथे डिलायला लोबो यांच्या प्रचारावेळी पत्रकारांकडे बोलताना मंत्री मायकल लोबो सोबत इतर

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar