म्हापसा शहरात असलेल्या रस्त्यांवरील निराधार बांधवांचे पुनर्वसन करण्याचे कार्य महाराष्ट्रातील जीवन आनंद संस्थेने हाती

.
म्हापसा  दि. २८ (प्रतिनिधी)
म्हापसा शहरात असलेल्या रस्त्यांवरील निराधार बांधवांचे पुनर्वसन करण्याचे कार्य महाराष्ट्रातील जीवन आनंद संस्थेने हाती घेतले आहे. त्यासंदर्भात जनमानसात व्यापक जनजागृती करण्यासाठी शनिवार १ जानेवारी रोजी दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत म्हापसा शहरातून रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
जीवन आनंद संस्था व रोटरी क्लब ऑफ म्हापसा यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या रॅलीचा  प्रारंभ टॅक्सीस्थानकावर दुपारी ४ वाजता झाल्यानंतर म्हापसा बाजारपेठेलागतचा रस्ता, मरड इत्यादी भागात गेल्यानंतर तेथून वळसा घेऊन ती रॅली पुन्हा टॅक्सीस्थानकावर येणार आहे. या रॅलीत प्रामुख्याने युवा युवतींचा सहभाग असणार आहे.
जीवन आनंद संस्थेचे संस्थापक संदीप परब यांच्या उपस्थितीत म्हापसा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना म्हापसा रोटरी क्लबचे अध्यक्ष अमेय वरेकर म्हणाले, की म्हापसा शहरात आपल्याला कित्येक निराधार व्यक्ती रस्त्यारस्त्यांवर , फुटपाथवर तसेच बसस्थानक,  टॅक्सीस्थानक इत्यादी ठिकाणी आढळून येतात. त्यांचे पुनर्वसन करणे हा या रॅलीचा प्रमुख उद्देश आहे.
संदीप परब म्हणाले, जीवन आनंद संस्था गेली दहा वर्षे निराधार बांधवांसाठी काम करीत आहे, मुंबई, ठाणे, पालघर येथे संस्थेचे आश्रम आहेत. तसेच गोव्यातील कित्येक निराधार बांधव आमच्या कुडाळ येथील आश्रमात या पूर्वी येत होते. परंतु त्यांच्या बाबतीत काही कायदाविषयक समस्या उपस्थित झाल्याने गोव्यातही काम करणे आवश्यक वाटले. त्यामुळे गोव्यात काम सुरू करून फोंडा तालुक्यात ‘माँ आसरोघर’ कार्यान्वित करण्यात आले आहे.
ते पुढे म्हणाले, म्हापसा शहरात रॅली काढण्याचा उद्देश म्हणजे गोव्यात लाखो पर्यटक येत असतात व ते जेव्हा मंदिरे, चर्च इत्यादी पाहण्यासाठी फिरतात तेव्हा रस्त्यांवरील  निराधारांना पाहून  पर्यटकांच्या मनांत गोव्याविषयी भलतेच चित्र निर्माण होत असते. वास्तविक म्हापसा हे सुंदर शहर आहे. गोव्यातील सर्वाधिक मोठी बाजारपेठ म्हापशात आहे. त्यामुळे गोव्याची प्रतिमा मलीन होऊ नये हा आमचा दृष्टिकोन आहे.
रस्त्यावरील निराधार हे आपलेच भारतीय बांधव आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना आश्रमात नेऊन, त्यांची योग्य ती साफसफाई करून, त्यांचे आजार-व्याधी इत्यादी दूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. अखेरीस त्यांचे मूळ घर शोधून काढून त्यांना घरी पाठवण्याचा प्रयत्न करणार अथवा त्यांचे पुनर्वसनही करणार आहोत, असेही श्री. परब म्हणले.
गोव्यात निराधार बांधवांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कुणी स्वतःचे घर सोडून आलेला असतो, काही जणांना कायदेशीर अथवा गरिबीची समस्या भेडसावत असते. टाळेबंदीच्या काळात तर कित्येक जणांना फुटपाथवर, रस्त्यावर जीवन घालवावे लागले, अशी माहिती संदीप परब यांनी या वेळी दिली.
     फोटो….. म्हापसा येथे घेतलेल्या पत्रकारपरिषदेत बोलताना जीवन आनंद संस्थेचे संस्थापक संदीप परब, सोबत अमेय वरेरकर

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar