खाद्यपदार्थ वृत्तपत्रांत गुंडाळून विक्री करणे आरोग्याला घातक असल्याने त्यावर बंदी घाला !  ‘आरोग्य साहाय्य समिती’ची अन्न आणि औषध प्रशासनाकडे मागणी

.
खाद्यपदार्थ वृत्तपत्रांत गुंडाळून विक्री करणे आरोग्याला घातक असल्याने त्यावर बंदी घाला !  ‘आरोग्य साहाय्य समिती’ची अन्न आणि औषध प्रशासनाकडे मागणी
पणजी, 28 डिसेंबर – खाद्यपदार्थ वृत्तपत्रांत गुंडाळून विक्री करणे आरोग्याला घातक असल्याने त्यावर बंदी घालावी, अशी मागणी ‘आरोग्य साहाय्य समिती’ने अन्न आणि औषध प्रशासनाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या वेळी ‘आरोग्य साहाय्य समिती’च्या शिष्टमंडळामध्ये सर्वश्री भारत हेगडे आणि महेश प्रभू यांचा समावेश होता.
या निवेदनात म्हटले आहे की, उपहारगृहे किंवा खाद्यपदार्थ विक्री करणारे गाडे वडापाव, भजी आदी खाद्यपदार्थ्यांची विक्री करतांना ते वृत्तपत्राच्या कागदांमध्ये गुडांळून विकत असल्याचे आढळून आले आहे. वास्तविक ‘फूड सेफ्टी आणि स्टॅँडर्डस एक्ट- २००६’ या कायद्यानुसार प्रत्येक ग्राहकाला सुरक्षित आणि शुद्ध खाद्यपदार्थ देणे बंधनकारक आहे. हा कायदा देशात 5 ऑगस्ट २०११ पासून लागू झालेला आहे. तसेच ‘फूड सेफ्टी अँड स्टँडडर्स अथोरिटी ऑफ इंडिया’ (एफ्.एस्.एस्.ए.आय.) यांनी 6 डिसेंबर 206 मध्ये काढलेल्या एका आदेशानुसार  ‘फूड सेफ्टी आणि स्टॅँडर्डस एक्ट- 2006’ या कायद्याचे पालन करणे बंधनकारक असल्याचे म्हटले आहे; मात्र या कायद्याचे कठोरतेने पालन होतांना दिसत नाही. वृत्तपत्राच्या कागदात गरम खाद्यपदार्थ गुंडाळले जातात तेव्हा वृत्तपत्रातील पेपरमधील  ‘आयसोबुटायलीन थायलेट’ आणि ‘डायिंग आयसोबुटायलीन’ ही रसायने विरगळून खाद्यपदार्थ आरोग्याला अपायकारक बनते. वृत्तपेपरची शाई खाणार्‍याच्या पोटात गेल्यास त्याला पचनाच्या समस्याही निर्माण होऊ शकतात. गोव्यात अन्न आणि औषध प्रशासनाने याविषयी जागृती करून असे प्रकार रोखावेत.
आपला विश्‍वासू,
डॉ. मनोज सोलंकी,
समन्वयक, आरोग्य साहाय्य समिती, गोवा.
(संपर्क क्रमांक : 9326103278)

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar