म्हापसा / प्रतिनिधी
क्रिस्ती्यानो रोनाल्डो हा एक जगप्रसिद्ध फुटबॉल पटू असून जगातील सर्व फुटबॉलपटुंचा आदर्श आहे. नवोदित फुटबॉल पटू आपण रोनाल्डो प्रमाणे व्हावे असा विचार करतात म्हणूनच कळंगुट येथील युवकांना रोनाल्डो चा पुतळा पाहून प्रेरणा मिळावी व स्पृर्ती मिळावी म्हणून या ठिकाणी रोनाल्डो याचा पुतळा बसवण्यात आला, या मागे कोणतेही राजकारण नाही असे प्रतिपादन घनकचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी केले.
उत्तर गोवा जिल्हा पंचायतीने कळंगुट पंचायतीच्या सहकार्याने कळंगुट आगरवाडो येथील हडफडे कळंगुट पुलास समांतर जोड रस्त्याच्या मधील मोकळ्या जागेत आकर्षक बगीचा तयार करण्यात आला असून मध्यभागी फुटबॉलला किक मारताना 450 किलो वजनाचा व 12 लाख किंमतीचा भव्य ब्रांझ चा रोनाल्डो चा पुतळा बसवण्यात आला. या पुतळ्याचे व बगीच्याचे उदघाट्न मंत्री मायकल लोबो यांच्या हस्ते करण्यात आले.
या पुतळ्याला नाहक विरोध करून काहीजण राजकारण करीत आहेत, जाती धर्मावरून काहीजण जनतेत फूट पडण्याचा प्रयत्न करीत आहेत, अश्या लोकांना जनता कधीही माफ करणार नाही. खेळावरून राजकारण करण्याची ही वेळ नाही, राजकारण करण्यास आणखी दीड महिना आहे त्यावेळी राजकारण करूया असा सल्ला मंत्री लोबो यांनी विरोध करणाऱ्यांना दिला.
दरम्यान पोर्तुगीजानी गोव्यावर राज्य करून गुलामीत ठेवले त्या पोर्तुगीज रोनाल्डोचा पुतळा न बसवता गोमंतकीय फुटबॉल पटूचा पुतळा बसवा किंवा शिवाजी महाराजांचा पुतळा बसवा या माणीसाठी व रोनाल्डोचा पुतळा हटवा या मागणी साठी येथील समविचारी राष्ट्रप्रेमी नागरिकांनी या ठिकाणी काळे झेंडे दाखवत निदर्शने केली.
फोटो……. कळंगुट येथे बसवण्यात आलेला जगप्रसिद्ध फुटबॉल पटू रोनाल्डो याचा पुतळा