विधानसभा खाजगी मालमत्ता बनवली आहे: आरजी

.

विधानसभा खाजगी मालमत्ता बनवली आहे: आरजी

आपण निवडून दिलेले प्रतिनिधी आज विधानसभेत आपले मुद्दे मांडून सोडवण्याऐवजी आपल्याला पाहिजे तसे वागून विधानसभा खाजगी मालमत्ता असल्यासारखे करत आहेत असा आरोप रिव्होल्युशनरी गोवन्सचे प्रमुख मनोज परब यांनी डिचोली येथे छत्रपती शिवाजी मैदानावर मंगळवारी आयोजित केलेल्या सभेत बोलताना केला. आपण निवडून दिलेले प्रतिनिधी फक्त साधे असले म्हणून झालेला आहे तर त्यांनी जनतेची मुद्दे विधानसभेत हाताळले पाहिजेत जर त्यांना ते जमत नसेल तर असले प्रतिनिधी विधानसभेत पाठवणे आपली चूक आहे.

एका पक्षात असताना दुसऱ्या पक्षावर टीका करणे नंतर टीका केली आहे त्याच पक्षात प्रवेश केल्यानंतर सर्व मंत्र्यांचे शुद्धीकरण होत आहे. आता सर्वांना घरी पाठवून विधानसभेचे शुद्धीकरण करण्याची वेळ आली आहे. आपले प्रतिनिधी गरीब असल्याचे बोलतात पण त्यांची संपत्ती मात्र दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आश्वासने मिळाली म्हणून आमची पोटे भरणार नाही, फूटपाथ रस्ते झाले म्हणजे विकास नव्हे. एका वर्षी रस्त करणे आणि पुढची पाच वर्ष तेच काम केल्याच्या बाता मारणे योग्य नाही. कारण आमदारांना आपण पाचही वर्षांचा पगार देतो, एकाच वर्षाचा नव्हे असे परब यांनी म्हटले.

डिचोलीचे उमेदवार अनिश नाईक व मये उमेदवार श्रीकृष्णा परब यांनी आपापल्या मतदारसंघातील समस्या स्क्रीन वरून प्रकाशित केल्या. विकासाच्या नावाखाली येणारे प्रकल्प कसे प्रदूषण करत आहेत. सुपीक जमिनी सरकाराच्या घालगरजी पणामुळे बकासुराचा मुखात पडल्या आहेत, कितीतरी प्रकल्प फक्त पायाभरणी करून अजूनही धूळ खात पडले आहेत. खोटी आश्वासने देऊन मतदारसंघातील युवकांना बेरोजगार ठेवले. या सर्व समस्यांचा आढावा त्यांनी घेतला. उद्योगीक वसाहात स्थानिक युवकांना नोकर्‍या दिल्या जात नाहीत असेही त्यांनी यावेळी म्हटले. वाढणारे परप्रांतीय, त्यांचे अतिक्रमण आणि गोवेकरांच्या हक्कावर कशा रीतीने राज्य गाजवत आहेत हे निदर्शनास आणले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar