गोव्याच्या प्रगतीसाठी योगदान द्या’ काँग्रेसचे व्यावसायिकांना आवाहन

.

*प्रसिद्धि पत्रक* ३०/१२/२०२१

‘गोव्याच्या प्रगतीसाठी योगदान द्या’

काँग्रेसचे व्यावसायिकांना आवाहन

पणजी: भ्रष्ट आणि असंवेदनशील भाजप सरकारमुळे गोव्याची परिस्थिती सर्व क्षेत्रात कोलमडली आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि प्रगती साधण्यासाठी गोव्याला योग्य दिशेने नेण्याची आवश्यकता आहे असे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे आणि यासाठी गोव्यातील व्यावसायिकांनी त्यांच्या सुचना आणि संकल्पना शेअर करण्याचे आवाहन केले आहे.

ऑल इंडिया प्रोफेशनल्स काँग्रेसच्या गोवा विभागाची स्थापना गुरुवारी करण्यात आली.यावेळी ऑल इंडिया प्रोफेशनल्स काँग्रेसचे मुख्य संचालन अधिकारी अलीम जवेरी, काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव, गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

ऑल इंडिया प्रोफेशनल्स काँग्रेसच्या गोवा विभागाच्या अध्यक्षपदी एल्विस गोम्स यांची, तर उपाध्यक्षपदी सिद्धार्थ कारापूरकर आणि सचिवपदी सीता आंताव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

यावेळी बोलताना एल्विस गोम्स म्हणाले की, व्यावसायिकांनी काँग्रेससोबत जोडून घेवून पक्षाचे भवितव्य त्यांच्या हातात घ्यावे. “कोणत्याही व्यवसायातील व्यक्ती यात सामील होऊ शकतात आणि गोव्याच्या कल्याणासाठी, तसेच राज्याला योग्य मार्गाने पुढे नेण्यासाठी चांगली धोरणे तयार करू शकतात. या माध्यमातून ते काँग्रेसला मदत करू शकतात.” असे गोम्स म्हणाले.

गोव्यात विभाग स्थापन करून गोव्यातील व्यावसायिकांना संधी दिल्याबद्दल चोडणकर यांनी एआयपीसीचे अध्यक्ष शशी थरूर यांचे आभार मानले. “गोव्याचे भवितव्य ठरवण्यासाठी या व्यावसायिकांनी योगदान दिले पाहिजे. ते आता आणि सरकार स्थापन झाल्यानंतरही त्यांचे विचार मांडू शकतात, जेणेकरून आम्हाला त्यांच्याकडून चांगले विचार मिळतील.” असे चोडणकर म्हणाले.

गोव्यात बदल घडवून आणण्याचे आव्हान स्वीकारण्याचे आवाहन त्यांनी व्यावसायिकांना केले.

“हा विभाग काँग्रेस पक्षाला वेगवेगळ्या कल्पना आणि सूचना मिळण्यास मदत करेल, राज्याच्या सुधारणेसाठी काय करणे आवश्यक आहे त्याचीही माहिती आम्हाला हवी.” असे राव म्हणाले.

ते म्हणाले की, गोवा महागाई, विक्रीसाठी काढलेल्या नोकऱ्या आणि पर्यावरणाचा ऱ्हास अशा अनेक समस्यांनी ग्रासले आहे. “गोव्याच्या या ज्वलंत प्रश्नांना भाजप दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे. या समस्यांचे निराकरण करून गोवा अधिक सुंदर बनवण्यासाठी आम्हाला व्यावसायिक संकल्पनांची गरज आहे. ” असे राव म्हणाले.

अलीम झवेरी म्हणाले की, तरुणांनी या चळवळीत सहभागी होऊन गोव्याच्या प्रगतीसाठी मदत करावी.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar