गोवा युवा स्पोर्टस क्लबतर्फे शिवोलीत बेल्ट परीक्षा
म्हापसा दि.30 ( प्रतिनिधी )
गोवा युवा स्पोर्ट्स क्लब तर्फे ब्राम्हण देवस्थान, मधलेभाट शिवोली येथे बेल्ट परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेत एकूण ४० मुलांनी भाग घेतला होता.
त्यापैकी गीतिका जीवाजी, रिषी राजपूत, श्रेयांश साळगावकर, केतन गोलतकर, श्रीवेश नाईक, तेजस नाईक, कुमकुम प्रजापती, श्रेयांश साळगांवकर, लक्षित प्रजापती, एब्रन मोन्तेरो, स्वास्ती मळवणकर, वैष्णवी लोटलीकर, शिवम साळगांवकर, पियुष काळोखे, प्रथमेश काळोखे, प्राची पावस्कर अशा १६ मुलांना ‘बेस्ट परफोमन्स अवॉर्ड’ देऊन गौरविण्यात आले. शाबीर नवलगुन्ड यांना ‘बेस्ट किक अवॉर्ड’ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मार्ना-शिवोलीच्या सरपंच शर्मिला वेर्णेकर, संख्येचे सरपंच नीलेश वायंगणकर, पंचायत सदस्य मोनाली पेडणेकर, सामाजिक कार्यकर्ता नीलेश गोललेकर, श्रीराम साळगावकर, संस्थेच्या कार्यकारी अध्यक्ष कृतिका गोलतेकर यांची उपस्थिती होती.