ग्रामसभा घेण्याचे टाळल्याबद्दल हणजूण कायसूव पंचायतीचे सरपंच सावियो अल्मेदा यांचे विरुद्ध कारवाई करा.

.

म्हापसा दि. 30 ( प्रतिनिधी )

        गटविकास अधिकाऱ्यांनी दोनदा आदेश देऊनही ग्रामसभा घेण्याचे टाळल्याबद्दल हणजूण कायसूव पंचायतीचे सरपंच सावियो अल्मेदा यांचे विरुद्ध कारवाई करून लवकरात लवकर ग्रामसभा घेण्याकरिता आदेश द्यावा असे तक्रार वजा निवेदन येथील ग्रामस्थांनी बार्देश च्या गटविकास अधिकाऱ्यांकडे दिले आहे.
      अधीक माहिती नुसार हणजूण कायसूव पंचायतीची शेवटची ग्रामसभा दि. 28/2/2021 रोजी घेण्यात आली होती, त्यानंतर करोना महामारीमुळे सर्व ग्रामसभा स्थगित करण्यात आल्या होत्या. सुमारे दहा महिन्यानंतर बार्देश च्या गटविकास अधिकाऱ्यांनी बार्देशातील पंचायतीना या वर्षाची शेवटची ग्रामसभा घेण्याकरिता नोव्हेंबर महिन्यात दि.21 रोजी ग्रामसभा घेण्याचे आदेश दिले होते, पण हणजूण कायसूव पंचायतीने त्या दिवशी ग्रामसभा घेण्याचे टाळले. काही पंचायतीनी ग्रामसभा न घेतल्याने गटविकास अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा आदेश काढून दि.26 डिसें.2021 रोजी ग्रामसभा घेण्यास फर्मावले पण या पंचायतीने याही वेळी ग्रामसभा घेण्यास टाळाटाळ केली.आदेशानुसार दि 21 नोव्हेंबर 2021 रोजी ग्रामसभा होणार असे वाटल्याने पंचायतीने ग्रामसभेची नोटीस काढलेली नसतानाही ग्रामस्थानी आपले लेखी सूचना व ठराव चर्चेसाठी पंचायतीकडे सादर केले होते.
       दुसऱ्यांदा ग्रामसभा घेण्याचा आदेश देऊनही ग्रामसभा घेण्यात येणार नसल्याचे कळाल्यानंतर ग्रामस्थ नाराज झाले. त्यानुसार त्यांनी हणजूण कायसूव पंचायतीची ग्रामसभा घेण्याचे पुन्हा निर्देश द्यावेत असे तक्रार वजा निवेदन बार्देशच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे दि.24 डिसें 2021 रोजी सादर केले,ग्रामसभेत ग्रामस्थांच्या प्रश्नानां तोंड न देण्याची चांगली संधी सरपंचला लाभल्याचे येथील ग्रामस्थ रवी हरमलकर यांनी सांगितले. यानंतर निवडणूक आचार संहिता लागल्यास पुढे पंचायत निवडणुका घेईपर्यत ग्रामसभाच होणार नसल्याने ग्रामस्थांचे प्रश्न व विकास कामाचे प्रश्न चर्चीले जाणार नसल्याचे संजय नार्वेकर यांनी सांगितले.
      दरम्यान विधानसभेच्या निवडणुकीचीतयारी करण्याकरिता प्रचारकार्यात दंग असलेल्या सरपंच सावियो अल्मेदा यांना ग्रामसभा न घेण्याबद्दल विचारले असता ग्रामसभा घेण्याकरिता जागा उपलब्ध नसल्याचे तकलादू कारण दिले. पंचायत गृह आरोग्य खात्यास दिले तरी बाहेर मोकळ्या जागेत किंवा पंचायतीच्या बहुउद्देशीय सभागृहात ग्रामसभा घेता आली असती असे ग्रामस्थ सांगतात.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar