नवीन वर्षाच्या सुरवातीलाच गौरावाडो, कळंगुट येथे 15 दुकानांना आग लागून करोडोंचे नुकसान झाले. दि.1 रोजी पहाटे 3.30 च्या दरम्यान ही घटना घडली.
पिलेर्ण अग्निशामक दलाचे अधिकारी रुपेश सावंत यांनी दिलेल्या माहिती नुसार कळंगुट येथे आग लागल्याचा फोन पिलेर्ण अग्निशामक दलास पहाटे 3.30 च्या दरम्यान आला.पिलेर्ण अग्निशामक दलाचे वाहन तेथे पोहचेपर्यत आगीने उग्र रूप धारण केले होते. आग आटोक्यात आणण्यासाठी म्हापसा अग्निशामक दलाचीही मदत घेण्यात आली, या आगीत तात्पुरती बांधकाम केलेली चौदा तयार कपड्याची दुकाने व एक चहाचे दुकान मिळून 15 दुकाने जळून खाक झाली. चहाच्या दुकानात असलेला गॅस सिलेंडर दलाच्या जवानांनी प्रसंगावधान राखून तेथून काढला अन्यथा प्रकार आणखी वाढला असता, तरीही या दुकानांच्या समोरील रस्त्यावर दुसऱ्या बाजूला पार्क करून ठेवलेल्या GA 07 F 7509 या आय10 गाडीला आगीची झळ पोहचून तीचे तसेच दुकानांच्या मागील बाजूस असलेल्या एका स्कुटरला आगीची झळ पोहचून त्यांचे नुकसान झाले. आगिचे नेमके कारण समजू शकले नसले तरी घातपाताची शक्यता नाकारता येत नाही. कळंगुट पोलिसांना व विजखात्यास आगीचे कारण शोधण्याकरिता कळवले आहे अशी सावंत यांनी माहिती दिली.
दरम्यान आपल्या कुटूंबायाच्या जागेत सुमारे पाच वर्षांपूर्वी ही दुकाने बांधण्यात आली होती आणी ती बिगर गोमंतकीयांकना भाड्याने दिली होती. पहाटे तीन च्या सुमारास आग लागल्याचे कळाल्यानंतर अग्निशामक दलास कळवले. बहुतेक सर्व कपड्यांचीच दुकाने होती. नुकसानीचा नक्की आकडा सांगता येत नसला तरी करोडोंचे नुकसान झाल्याची माहिती नोएल फर्नांडिस याने दिली.
फोटो……. गौरावाडो, कळंगुट येथे लागलेल्या आगीत जळून खाक झालेली दुकाने