प्रवीण आर्लेकर यांनी राजकारणात योग्य वेळ साधली असून त्यांनी केलेला भाजप प्रवेश हा पेडणे मतदारसंघात भाजपला पुन्हा यश मिळवण्यासाठी बळ देणारा आहे.
मगो सोडून भाजपमध्ये गेलेले मनोहर आजगावकर यांनी गेल्या कित्येक वर्षांत मतदारसंघात लक्षणीय विकास करण्याकडे दुर्लक्ष केले. आता मतदारसंघात जनाधार विरोधात जात असल्याची आजगांवकर यांची खात्री बनल्याने ते सैरभैर झाले आहेत. मतदारसंघातील जनतेचा केवळ आपणच तारणहार असल्याच्या आविर्भात ते आहेत. आपल्यामुळे भाजपचे सरकार अगदी मध्यरात्री घडले अशी दर्पोक्ती ते करू लागले आहेत. आजवर काँग्रेस, भाजप, काँग्रेस, मगो आणि भाजप असा राजकीय प्रवास त्यांनी स्वतःसाठीच केला अन्यथा मतदारसंघाचा सर्वांगिण विकास झाला असता आणि बेरोजगारी दूर झाली असती. आजगांवकर यांना पराभव समोर दिसताच बेरोजगार असलेला युवावर्ग आठवला आहे. पावलोपावली जनतेचा अपमर्द करताना त्यांना मतदार दिसत नव्हते. या कारणामुळेच त्यांच्या विरोधात वातावरण तयार झाले. प्रवीण आर्लेकर यांनी गेल्या दोन वर्षात जनतेच्या समस्या समजून घेतल्या, त्यांच्या अडचणीत धावून आले. लोकप्रतिनिधी बनण्यासाठीची त्यांची गुणवत्ता आहे. यामुळेच मतदार त्यांच्या पाठीशी आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी जनतेला काय हवे हे ओळखले म्हणूनच आर्लेकरसारखा मोहरा त्यांनी भाजप गोटात येईल हे पाहिले. भाजपला विजयाचा अश्वमेघ दौडत ठेवायचा असल्याने राजकारणात त्यांनी अनेक प्रयोग केले आहेत. प्रवीण आर्लेकर यांच्या रूपाने भाजपला एक आमदार मिळणार हे नक्की. आजगांवकर यांनी आता आत्मपरीक्षण करून आपले काय चुकले हे पाहावे. जेणेकरून त्यांना आणखी जनक्षोभाला सामोरे जाण्याची वेळ येणार नाही. भाजप आणि प्रवीण आर्लेकर यांना शुभेच्छा.
– रेश्मा पाडलोसकर, धारगळ
प्रवीण आर्लेकर यांनी राजकारणात योग्य वेळ साधली असून त्यांनी केलेला भाजप प्रवेश

.
[ays_slider id=1]