पी. चिदंबरम आणि जयराम रमेश यांच्याशी 04 जानेवारी रोजी लोकांचा संवाद

.

पी. चिदंबरम आणि जयराम रमेश यांच्याशी
04 जानेवारी रोजी लोकांचा संवाद

काँग्रेस पक्षाने 04 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता म्हापुसा येथील बोडगेश्वर मंदिर सभागृहात, एनजीओ सोबत माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम आणि जयराम रमेश यांच्याशी संवादाचे आयोजन केले आहे.

पर्यावरण, बेरोजगारी, आरोग्य, महिलांच्या समस्या, कायदा आणि सुव्यवस्था या बद्दल समाजाच्या विविध घटकांनी ठळकपणे मांडलेले मुद्दे लक्षात घेऊन गोव्याचे प्रभारी निरीक्षक श्री पी. चिदंबरम यांनी विविध स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्थांशी संवाद साधण्याची इच्छा व्यक्त केली होती.

टॅक्सी ड्रायव्हर्स असोसिएशनसह संस्था, व इतर संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित असतील. लोकांच्या समस्या समजून घेण्यासाठी आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी काँग्रेस पक्षाचे नेते सुचना करतील.
श्री. पी चिदंबरम यांनी गोव्यातील कित्येक मतदारसंघात भेट दिली होती तेव्हा लोकांनी त्यांना निवेदने दिली होती. यासाठी त्यांनी त्यांच्या बरोबर संवाद साधण्याचा कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरविले होते.

एनजीओ आणि कित्येक संस्थांनी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपली नावे नोंदवली आहेत. या कार्यक्रमा दरम्यान येणाऱ्या सुचनातून गोवा राज्याच्या विकासासाठी एक आराखडा तयार केला जाईल असे काँग्रेस पक्षाने म्हटले आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar