वीर सावरकर : राखेतून एका प्रेषिताचा उदय !*- *उदय माहूरकर, केंद्रीय माहिती आयुक्त, भारत*

.

L

*वीर सावरकर : राखेतून एका प्रेषिताचा उदय !*- *उदय माहूरकर, केंद्रीय माहिती आयुक्त, भारत*

एखाद्या राष्ट्राच्या इतिहासात असा एक क्षण येतो जेव्हा त्याने आपल्या भूतकाळावर चिंतन केले पाहिजे आणि आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी विविध ‘वाद’ ओलांडून खोल आत्मनिरीक्षण केले पाहिजे. आज असा क्षण भारतासाठी आला आहे. विशेष म्हणजे इतिहासाचा ‘कॅनव्हास’ कधी कधी खूप फसवा असतो. त्यात चिरंतन नायकांसारखे दिसणारे लोक काही दशकांनंतर किंवा त्यांच्या निधनानंतर फिकट गुलाबी आकृत्यांमध्ये बदलतात. याउलट, इतिहास जसजसा उलगडत जातो, तसतसे त्यांच्या हयातीत दुर्लक्षित, उपेक्षित म्हणून हिणवले गेलेले काही जण नायक म्हणून उदयास येतात आणि त्यांचे खरे चरित्र आणि राष्ट्रासाठीचे योगदान जगासमोर येते. यातील पहिल्या वर्गात जवाहरलाल नेहरू येतात, ज्यांनी भारतीय स्वातंत्र्यानंतर संस्थात्मक उभारणीचे विलक्षण कार्य केले; मात्र आज भारताचे नायक म्हणून त्यांची ओळख नेहरूप्रेमी असणार्‍या एका छोट्या गटापुरती उरली आहे. याचे मुख्य कारण आहे, त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणाच्या आघाड्यांवर केलेल्या अनेक चुका ! ज्या चुकांसाठी भारताने मोठी किंमत मोजली आहे. शिवाय, त्यांच्या अल्पसंख्यांक तुष्टीकरणाच्या धोरणांमुळे भारताला फाळणीचा आघात स्वीकारावा लागला आहे.
दुसर्‍या वर्गात ‘वीर सावरकर’ येतात. 1966 मध्ये एक ‘उपेक्षित वीर’ म्हणून त्यांचे निधन झाले. तथापि, आज कलम 370 रद्द करणे, पाकिस्तानात घुसून बालाकोट येथील आतंकवादी तळ उद्धवस्त करणे, तसेच विघटनकारी शक्तींच्या विरोधात मजबूत सुरक्षा संरचना तयार करून जागतिक स्तरावर आपले अस्तित्व दाखवून देणे, या स्थितीत भारत आला असेल, तर त्याला कारणीभूत स्वा. सावरकरांची फुटिरतावादी शक्तींशी कोणतीही तडजोड न करण्याची दृष्टी आहे. आडमुठ्या राष्ट्रांसोबत जशास तसे धोरण, मुत्सद्दीपणा आणि भारताच्या उज्ज्वल भवितव्यावर निर्विवाद विश्वास, हे सावरकरांचे दूरगामी धोरण होते. भारताची सुरक्षा तसेच मुत्सद्देगिरी यांच्या संदर्भात सावरकरांची दूरदृष्टी अतुलनीय आहे. भारताला गेल्या 70 वर्षांत भेडसावलेल्या राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित समस्यांचे भाकीत त्यांनी सुमारे 80 वर्षांपूर्वीच वर्तवले होते. त्यांचा निस्सीम राष्ट्रवाद किंवा हिंदुत्व हे सेक्युलरवाद्यांप्रमाणे भेदभाव करणारे नव्हते. सावरकर एक विद्वत्तापूर्ण संघटक, नव्हे तर एक प्रेषित म्हणून उठून दिसतात; मात्र त्यांची समर्थ भारताची संकल्पना मान्य नसणार्‍यांनी, तसेच तत्कालीन विभाजनवादी शक्तींशी हातमिळवणी केलेल्यांनी केवळ स्वतःच्या राजकीय तसेच वैचारिक मतभेदापोटी सावरकरांना अस्पृश्य ठरवून त्यांची सदैव निंदाच केली.
या कारणांमुळे सावरकरांची भारताची कल्पना काय होती, ते मी आणि माझे सहलेखक चिरायू पंडित यांनी या पुस्तकाद्वारे देशासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यातून असा भारत अपेक्षित आहे की, ज्याला बलशाली, लढाऊ, मुत्सद्दी आणि कुशल म्हणून जागतिक स्तरावर मान्यता असेल, तसेच राष्ट्र प्रथम हेच प्रमुख तत्त्व असेल आणि कोणत्याही प्रकारच्या धार्मिक तुष्टीकरणाला स्थान नसेल.
फार कमी लोकांना माहीत आहे की, नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जपानला पळून जाण्यात आणि इंग्रजांविरुद्ध युद्ध करण्यासाठी विरोधी शक्तींची मदत घेण्यात सावरकरांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.  यामागे सावरकरांचा विचार होता की, जागतिक स्तरावर कोणतीही दोन राष्ट्रे कायमस्वरूपी शत्रू किंवा मित्र नसतात. पाकिस्तानची भविष्यातील भारतविरोधी भूमिका आणि अल्पसंख्यांक तुष्टीकरणावर आधारित हिंदू-मुस्लिम समस्या यांचे भाकीत करण्याव्यतिरिक्त सावरकरांनी 1962 च्या भारत-चीन युद्धाचे भाकीत 1954 मध्ये, म्हणजे आठ वर्षे अगोदरच केले होते. नेहरू चीनसोबत पंचशील आणि शांतता यांविषयी बोलत असतांना सावरकरांची प्रतिक्रिया भविष्यसूचक होती. ते म्हणाले, चीनला तुमच्या पंचशीलाची पर्वा नाही; कारण तुमचे पंचशील जपमाळेतील मण्यांचे आहे, तर त्यांच्या पंचशीलात रणगाडे, पाणबुड्या, तोफा, बॉम्बर आणि अणुबॉम्ब आहेत. आज (आपले) राष्ट्र केवळ लेखणीने चालवले जाते. ते तलवारीने चालवले पाहिजे. देशबांधवांनो, माझा तुम्हाला संदेश आहे की, सैन्याचे आधुनिकीकरण करा. जर इतर राष्ट्रांनी हायड्रोजन बॉम्बचा शोध लावला, तर तुम्ही ऑक्सिजन बॉम्बचा शोध लावा. तरच तुम्ही भारताला एक मजबूत राष्ट्र बनवू शकता आणि स्वाभिमानाने जगू शकता. 1948 मध्ये चीनच्या जन्मावेळी भारत लष्करीदृष्ट्या चीनच्या तुलनेत बलाढ्य होता; पण नेहरूंच्या धोरणांमुळे चीनने लष्करी सामर्थ्यात भारताला झपाट्याने मागे टाकले. इथेही सावरकर किती भविष्यसूचक होते.
सावरकरांना त्यांच्या हिंदुत्वाच्या विचारसरणीसाठी खूप अपमानित केले जाते. तथाकथित सेक्युलरवादी-वामपंथी-इस्लामी वर्चस्ववादी या त्रिकुटाने त्यांना मुस्लिमविरोधी विचारसरणीचे समर्थक ठरवले आहे; मात्र वस्तुस्थिती नेमकी उलटी आहे. त्यांनी त्यांच्या स्वतंत्र भारताच्या हिंदू घोषणापत्रात सर्व जाती आणि धर्मांना समान हक्क देण्याचे वचन दिले आहे. इतकेच नव्हे तर एक पाऊल पुढे जाऊन अल्पसंख्याकांना त्यांच्या प्रार्थनांत अडथळा येत असल्यास प्रसंगी संरक्षण देऊ, असेही सांगितले आहे; परंतु ‘धार्मिक अल्पसंख्याकवादा’च्या नावाने भारतात आणखी एक देश निर्माण करण्याचा प्रयत्न चालणार नाही, असा कडक इशाराही दिला होता. दुर्दैवाने गेल्या ७० वर्षांत भारतात हेच प्रयत्न चालू आहेत. विशेष म्हणजे, सावरकरांनी 1937 मध्ये सक्रिय राजकारणात प्रवेश केल्याच्या दिवसापासूनच काँग्रेसच्या मुस्लिम तुष्टीकरणाच्या राजकारणाच्या परिणामांविषयी चेतावणी दिली होती. ही भारताची फाळणी होण्याच्या 10 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्यामुळे या पुस्तकाद्वारे पाकिस्तानची निर्मिती रोखण्यासाठी सावरकरांनी केलेल्या सर्व कृतींचा मागोवा घेऊन काँग्रेसने सावरकरांच्या सल्ल्याकडे लक्ष दिले असते तर फाळणी टाळता आली असती का, याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे.
सावरकर विचारांचे अभ्यासक दिवंगत ज.द.जोगळेकर यांनी आपल्या लेखणीतून सावरकरांचे विचार आणि व्यक्तिमत्त्व यांचा प्रसार करण्याचे स्तुत्य कार्य केले आहे. सावरकरांच्या मृत्यूवर भाष्य करताना, त्यांनी त्यांच्या एका उत्कृष्ट लेखनाचा शेवट अत्यंत दुःखाने केला आहे. त्यात ते म्हणतात, ‘एक उत्कृष्ट नायक अनंतात विलीन झाला. एका युगाचा अंत झाला. एक प्रेषित दुर्लक्षित म्हणून मरण पावला. जोगळेकरांना या वेदनांमध्ये एका वैश्विक सोनेरी तत्त्वाचा विसर पडला होता की, निसर्गाच्या नियमानुसार, अंतिमतः सत्यच विजयी होते. कदाचित त्यास वेळ लागला म्हणून काय झाले ? बुद्धाच्या निर्वाणानंतर 200 वर्षांहून अधिक काळ भगवान बुद्ध आणि बौद्ध धर्म दुर्लक्षित होता. जेव्हा सम्राट अशोकाने बौद्ध तत्त्वांचा स्वीकार करून सर्वदूर बौद्ध धर्माचा प्रचार करण्यास प्रारंभ केला, तेव्हाच तो इतरांना कळला. त्या काळी कोणीही विचार केला नसेल की, 2000 वर्षांनंतर, बौद्ध धर्म हा जगातील चौथा सर्वात मोठा धर्म असेल. बुद्धाप्रमाणेच सावरकरांचे विचार अनेक दशके दुर्लक्षित राहिले; मात्र आज सावरकर युगाचा प्रारंभ होत आहे.

*पुस्तक प्रकाशन समारंभ*

*‘वीर सावरकर : दी मॅन हु कुड हॅव प्रीवेंटेड पार्टीशन’*
*लेखक :* उदय माहूरकर आणि चिरायू पंडित
*तारीख :* 9 जानेवारी 2022 दुपारी 4.30 वाजता
*स्थळ :* केमिकल सायन्स ऑडिटोरियम, गोवा विद्यापीठ, तालीगाव, पणजी.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें