कुचेली वाताहार
सांगोल्डा येथील श्री राष्ट्रोळी शांतादुर्गा युवा मडंळ चा २१ वधापनदीन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार जयेश साळगावकर तर अध्यक्षस्थानी गीरी कोमुनिदादचे अध्यक्ष तुलीयो डिसोझा उपस्थित होते
यावेळी कोविड काळात चांगली कामगिरी केलेल्या मेधीनी कांदोळकर, साहील कांदोळकर, जोती कांदोळकर, सुकांती कोरगांवकर, सुमी कोरगांवकर याचा टाॅफी देऊन प्रमुख पाहूणाचा हस्ते गौरव करण्यात आला. तसेच समीक्षा च्यारी व साहील कांदोळकर याना शिष्यवृत्ती देण्यात आली.
यावेळी बोलताना जयेश साळगावकर यांनी श्री राष्ट्रोळी शांतादुर्गा युवा मंडळ याचे अभिनंदन करताना सांगितले की २१ बषै हे युवा मंडळ कार्य करीत आले आहे , त्यांनी हे कार्य असेच पुढे चालू ठेवावे.
यावेळी जिल्हा पंचायत अध्यक्ष कार्तिक कुडणेकर, जिल्हा पंचायत सदस्य रूपेश नाईक आदी उपस्थित होते
सांगोल्डा गावचे सरपंच उल्हास मोरजकर माजी सरपंच दिलीप कलंगुटकर, नीळकंठ नाईक ( माजी सरपंच) व पुष्पा नाईक आदी उपस्थित होते
दीपक च्यारी यांनी आभार मानले.