भाजपचे युवा नेते गजानन तिळवे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

.

भाजपचे युवा नेते गजानन तिळवे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

पणजी: भाजप सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही टोकाला जाऊ शकतो आणि या पक्षात आता कोणतीही तत्त्वे राहिलेली नसल्याचा आरोप करून भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य गजानन तिळवे यांनी रविवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव, युवक काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. वरद म्हार्दोळकर, अखिलेश यादव, अर्चित नाईक, साईश आरोसकर, हिमांशू तिवरेकर आदी यावेळी उपस्थित होते.

गजानन तिळवे यांच्यासह संकेत पार्सेकर, विनय वायंगणकर, ओम चोडणकर, अमित नाईक, झिओन डायस, बासिल ब्रागांझा, नीलेश धारगळकर, प्रतीक नाईक आणि नीळकंठ नाईक यांनीही काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

“काहीही करून सत्ता मिळवणे हा भाजपचा हेतू आहे. भाजपमध्ये तत्त्वे नाहीत. हा पक्ष आता बदलला आहे. यामुळे मी भाजप सोडून काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. मला आशा आहे की काँग्रेस बहुमताने जिंकेल आणि सरकार स्थापन करेल.’’ असे तिळवे म्हणाले.

ते म्हणाले की, शिवोली मतदारसंघ विकासात मागे आहे. “मला आशा आहे की काँग्रेस आम्हाला आमच्या मतदारसंघाचा विकास करण्यास मदत करेल.” असे ते म्हणाले.

दिनेश गुंडू राव म्हणाले की, गजानन तिळवे यांच्या प्रवेशाने काँग्रेस पक्ष मजबूत होईल. “संपूर्ण भारतात आणि गोव्यात भाजप अपयशी ठरला आहे. भाजपमध्ये कोणतीही तत्त्वे नाहीत, नैतिकता नाही, आणि ते सर्वात भ्रष्ट सरकार आहे.’’ असे राव म्हणाले.

ते म्हणाले की, नोकऱ्यासाठी तरुणांना पैसे द्यावे लागत आहेत ही खूप वाईट गोष्ट आहे. ‘भाजपचे मंत्री आणि आमदार सरकारवर आरोप करत आहेत, हे आश्चर्यकारक आहे. पण भाजप चौकशी करण्याच्या मनस्थितीत नाही.’’ असे राव म्हणाले

विधानसभा निवडणुकीत जनता भाजपला नाकारेल, असे दिनेश राव म्हणाले. ‘‘केवळ काँग्रेसच स्थिर सरकार देऊ शकते. कटीबद्धता आणि राजकारणाची जाण असलेले तरुण नेते काँग्रेसमध्ये सामील होत आहेत याचा मला आनंद वाटतो.’’ असे ते म्हणाले.

भाजपने लोकशाहीची हत्या केल्याचे तरुणांना कळले असून त्यामुळे ते काँग्रेसकडे आकर्षित होत असल्याचे दिगंबर कामत म्हणाले. “आम्ही गजानन तिळवे आणि त्यांच्या सर्व समर्थकांचे काँग्रेस पक्षात स्वागत करतो.” असे ते म्हणाले.

ॲड. वरद म्हार्दोळकर म्हणाले की, भाजपच्या युवा मोर्चात फॅमिली राज होत असून, त्यामुळे तिळवे यांना भाजप सोडावा लागला. “केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असतानाही ते काँग्रेसमध्ये सामील झाल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.” असे म्हार्दोळकर म्हणाले.

अखिलेश यादव यांनीही भाजप सरकारवर निशाणा साधत, भाजपने नोकऱ्या विकून तरुणांच्या भविष्याशी खेळ केला आहे असे म्हटले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar