काँग्रेस सरकारच लोकांच्या वेदना कमी करू शकते: प्रसाद गावकर

.

काँग्रेस सरकारच लोकांच्या वेदना कमी करू शकते: प्रसाद गावकर

पणजी : भाजप सरकाराच्या काळात राज्यातील समस्या वाढल्या असून त्या कमी करण्याचा आणि नियंत्रण आणण्याचा उपाय केवळ काँग्रेस पक्षाकडे असल्याचे सांगे मतदारसंघाचे माजी अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी रविवारी म्हटले. “काँग्रेसला सत्तेत आणण्यासाठी आणि स्थिर सरकार मिळवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊ या.” असे आवाहन गावकर यांनी केले.

प्रसाद गावकर यांनी रविवारी आमदारकीचा राजिनामा देऊन संध्याकाळी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव, युवा अध्यक्ष ॲड. वरद म्हार्दोळकर आणि इतर नेते उपस्थित होते.

प्रसाद गावकर यांच्या अनेक समर्थकांनीही काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सांगे मतदारसंघातून काँग्रेस पक्षाला विजयी करू असे गावकर यांच्या समर्थकानी सांगितले.

प्रसाद गावकर म्हणाले की, त्यांनी यापूर्वी काँग्रेससाठी काम केले होते आणि आता त्यांनी पुन्हा काँग्रेसचे काम पुढे नेण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. “आपण सर्वांनी संघटित होऊन सांगे मतदारसंघाला पूर्वीप्रमाणेच काँग्रेसचा मजबूत बालेकिल्ला बनवण्याची गरज आहे.” असे ते म्हणाले.

“गोव्यातील लोक त्रस्त आहेत. हे सर्व प्रश्न सोडवून गोवा वाचवायचा आहे. मला वाटते फक्त काँग्रेसच आमची स्वप्ने प्रत्यक्षात आणू शकते. आम्हाला बहुमत द्या आणि सत्तेत येण्यासाठी आम्हाला पाठिंबा द्या.’’ असे आवाहन गावकर यांनी गोव्यातील जनतेला केले.

प्रसाद गावकर यांचे स्वागत करताना दिनेश गुंडू राव म्हणाले की, प्रसाद गावकर यांना चांगला अनुभव असून ते अनुसुचित जमातीचे एक चांगले नेते म्हणून ओळखले जातात. “काँग्रेसला सत्तेत आणण्यात त्यांची मोठी भूमिका असेल.” असे राव म्हणाले.

“गोव्यातीतल समस्यांचे निराकरण करण्यासाठी एक मजबूत आणि स्थिर सरकार आवश्यक आहे. तसेच लोकशाही वाचवण्यासाठी पक्षांतर थांबवले पाहिजे. काँग्रेस सत्तेवर आली तरच हे होऊ शकते.’’ असे राव म्हणाले.

एल्विस गोम्स म्हणाले की, भाजपची मतांची विभागणी करण्याचा राजकीय कल गोव्यातही पोहोचला आहे. “आम्ही सर्व एकत्र आहोत आणि कोणीही आमच्यात फूट पाडू शकणार नाही. प्रसाद गावकर यांच्या प्रवेशाने काँग्रेस मजबूत झाली आहे.’’ असे ते म्हणाले.

“प्रसाद गावकर हे अनुसूचित समाजाचे प्रामाणिक प्रतिनिधी आहेत.” असे ते म्हणाले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar