पतंजली योग समीती गोवा राज्य यांच्यातर्फे पतंजली योगपीठ हरिद्वार मान्यता प्राप्त सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन धुळेर म्हापसा येथील सिद्धार्थ हाॅल येथे भारत स्वाभिमान चे अध्यक्ष कमलेश बांदेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पतंजली योग समितीचे अध्यक्ष विश्वास कोरगांवकर, संरक्षक श्री राघव शेट्टी, पतंजली योग समीती युवा अध्यक्ष गिरीश परूळेकर, महीला प्रमुख संध्या खानोलकर, गोवा राज्य पतंजली किसान अध्यक्ष तुळशीदास मंगेशकर, महिला राज्य सचिव पुजा मंगेशकर, संदीप मोरजकर उपस्थित होते. २५ दिवस चालणारा योग शिबीराचा लाभ योग शिक्षकांनी घ्यावा असे आवाहन कमलेश बांदेकर यांनी केले.
आपले शरीर निरोगी राहण्यासाठी योग शिक्षणाची आज गरज असून त्या दृष्टीने प्रत्येकाने सूर्यनमस्कार, प्राणायाम, आसने याचा अभ्यास करावा असे बांदेकर यांनी पुढे बोलताना सांगितले
शिबीरात दर दिवशी प्राणायाम,
सूर्यनमस्कार, चर्चासत्र,संवाद याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे विश्वास कोरगांवकर यांनी सांगितले
या योग प्रशिक्षण शिबिरात ३0 शिबीराथी. सहभागी झाले आहेत.