मकर संक्रांती – योगी अश्विनी लिखित

.

मकर संक्रांती – योगी अश्विनी लिखित
‘संक्रांती’ या संस्कृत शब्दाचे भाषांतर ‘स्थानांतरण’ असे केले जाते आणि ह्या शब्दाचा उपयोग वर्षभरात एका नक्षत्रातून दुसर्या नक्षत्रात सूर्याची हालचाल दर्शविण्यासाठी केला जातो… आपल्या पूर्वजांना सृष्टीचे बारकावे, सूर्य आणि ग्रहांची गती, आकार, देश ही माहिती सहस्राब्दी पूव वर्षा पासुन होती. वर्षभरात बारा संक्रांति पाळल्या जातात हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. आपल्या पूर्वजांना हे देखील माहित होते जे बहुसंख्य लोक विसरले आहेत आणि ते म्हणजे ऊर्जेचे ज्ञान- अंतरिक्षातल्या विभिन्न ग्रहांची शक्ति आणि त्यांच्या संक्रमणाच्या काळी सृष्टीच्या ऊर्जा शैली मध्ये परिवर्तण.
सूर्य ही एक शक्ती आहे, जी पृथ्वीवासीयांसाठी विशेष महत्त्वाची आहे. ही ऊर्जा आहे जी ग्रहावरील जीवन टिकवून ठेवते, जी आधुनिक विज्ञानाप्रमाणे निर्विवाद आहे. सूर्याचे तेज हा एक अनुभव आहे जो आपल्यापैकी प्रत्येकाने घेतला आहे, इतका अलौकिक तेजस्वी की उघड्या डोळ्यांनी उज्ज्वल सूर्याकडे पाहणे शक्य नाही. पूर्वीच्या कृषीनी सूर्याचे अनुसरण केले. गीता म्हणते, तुम्ही ज्याचे अनुसरण करता ते बनता. आणि म्हणून ऋषी सूर्यासारखे आभाशाली होते आणि त्यांच्याकडे सूर्यासारखे सामर्थ्य होते. उदाहरणार्थ, ऋषी विश्वामित्रांनी सूर्याचे अनुसरण करून गायत्री महामंत्र प्राप्त केला, तथा या मंत्राच्या बळावर समांतर विश्वाची निर्मिती केली .
सूर्य हा अनंत ज्ञानाचा आणि सृष्टीच्या रहस्यांचा देव आहे. ते भगवान हनुमानाचे गुरु आणि तेजस्वी सूर्यवंशाचे पूर्वज आहेत, ज्यामध्ये मनू, राजा भगीरथ, राजा रघु आणि भगवान राम यांसारखे वीर जन्मले. सूर्याचे अस्तित्व धर्माच्या पूर्वी आहे आणि तो पृथ्वीवर आश्रित प्रत्येक जीव जंतु याना धर्म, जात किंवा जन्म यांचा भेद न करता उष्णता आणि प्रकाश देतो. म्हणजेच सूर्याला कोणताही धर्म माहीत नाही. विशेष म्हणजे, एका पाश्चात्य विद्यापीठाने सूर्याचा ध्वनी रेकॉर्ड केला आहे आणि त्यातून निघणारा आवाज हा ॐ चा आवाज आहे (आपण तो ध्यान फाउंडेशनच्या वेबसाइटवर ऐकू शकता. हा ध्वनीच आहे जो रंगांच्या रूपात प्रकट होतो, जो पुढे पाच घटकांमध्ये प्रकट होतो ज्यामुळे भौतिक सृष्टीची निर्मिती झाली आहे. भारतवर्षाच्या ऋषींनी, हजारो वर्षांपूर्वी सृष्टीच्या ध्वनिचा उपयोग करून आम्हाला ॐ हा मंत्र दिला.
प्राचीन काळात मकर संक्रांतीचे विशेष महत्त्व होते, कारण हा सूर्याच्या उत्तर दिशेकडील गमन (संस्कृतमध्ये उत्तरायण) सुरू होण्याचा मुहूर्त होता. मकर राशीच्या नक्षत्रात सूर्याने प्रवेश केला त्या नंतर आधुनिक शास्त्रज्ञांनी सूर्याच्या मार्गातील दक्षिणेकडील अक्षांशाच्या नंतरच्या मकर राशीला उष्णकटिबंध (Tropic of Capricorn) असे नामकरण केल्याने कोणतीही अंधश्रद्धा दिसून येत नाही. हे शुभ कालावधी चिन्हित करते आणि यापुढे दिवस अधिक मोठे आणि उजळ होतील. महाभारत काळातील भीष्म पितामह आपला मोक्ष सुलभ कारण्यासाठी, आपले शरीर सोडण्यासाठी या दिवसाची वाट पाहत होते.
सूर्य फक्त भारतवर्षासाठीच नाही तर जगभर विशेष होता. आजपर्यंतचे इंग्रज प्रत्येक वेळी एकमेकांना ‘ए सनी डे’ [‘a sunny day] म्हणून शुभेच्छा देतात…प्राचीन इजिप्शियन लोक सूर्याची अटम आणि होरस म्हणून, मेसोपोटेमियन लोकांनी शमाश म्हणून, जर्मन लोक सोल म्हणून, ग्रीक लोक हेलिओस आणि अपोलो म्हणून सूर्याची पूजा करतात. रोमन साम्राज्यानेही अजिंक्य सूर्याचा जन्म हिवाळी संक्रांती (उत्तरायण) रोजी साजरा केला जो त्या वेळी 25 डिसेंबरला होता.
पृथ्वीच्या अक्षात बदल झाल्यामुळे, उत्तरायणाची घटना मकर संक्रांती (भारतीय दिनदर्शिकेनुसार 14 जानेवारीला सूर्याचा मकर राशीत प्रवेश) वरून 22 डिसेंबरपर्यंत सरकली आहे, जेव्हा सूर्य धनु मध्ये असतो.
सूर्याच्या हालचालीतील हे सूक्ष्म बदल आणि त्यांचा सृष्टीच्या विविध पैलूंवर होणारा परिणाम हे ध्यान आश्रमातील सूर्यसाधक नियमितपणे पाळतात आणि अनुभवतात आणि सृष्टीच्या फायद्यासाठी गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ध्वनी किंवा मंत्रांच्या विज्ञानाद्वारे वापरतात.
नवशिक्यासाठी, मी मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रमणाच्या वेळी सूर्याच्या ऊर्जेचा वापर करण्यासाठी एक सोपा सराव लिहून देतो. सूर्योदयाच्या वेळी सूर्याच्या दिशेकडे तोंड करून बसावे किंवा उभे राहावे. गुरूंची आज्ञा घेऊन भुवयांच्या मध्यभागी सूर्याचे भान ठेवून “राम” मंत्राचे उच्चारण करून सुरुवात करा (योग्य मंत्रासाठी तुम्ही dhyafoundation.com ला भेट देऊ शकता). आपली जाणीव/ लक्ष छातीच्या पोकळीच्या मध्यभागी आणि शेवटी नाभीच्या बिंदूपर्यंत नेत असताना नामजप सुरू ठेवा. तोपर्यंत सूर्य पहाट कालीन आकाशात हलक्या गुलाबी रंगाच्या आभेच्या रूपात दिसला जाईल. यावेळी सूर्याला पाणी अर्पण करा आणि डोळे बंद करा. प्राप्त केलेला सूर्याचा प्राण तुमच्या संपूर्ण शरीरात वितरित करा. काही वेळानंतर, आपले तळवे किंवा हिरवळ किंवा हिरव्या झाडांकडे पहात आपले डोळे उघडा.
सावधगिरीचा एक शब्द: तेजस्वी सूर्याकडे थेट पाहू नका. देखरेखीखाली सराव करा.
देशी गायी आणि बैलांना मालिश [massage] करून खायला दिल्यास सराव उत्तम परिणाम देते.
देशी गायी आणि बैलांना एक कुबडा [ hump] असतो, ज्याला सूर्यकेतु नाडी म्हणतात, जी सूर्याच्या उर्जेचा उपयोग करते – गायी आणि बैलांच्या सेवेद्वारेही उत्तम परिणाम येऊ शकतात. ध्यान फाउंडेशनच्या गोशाळेला भेट द्या आणि या अद्भुत प्राण्याच्या ऊर्जेचा अनुभव घ्या.
ध्यान आश्रमातील योगी अश्विनी यांच्याशी dhyanashram.ya@gmail.com वर संपर्क साधता येईल. ध्यान फाउंडेशनतर्फे शुक्रवारी, १४ जानेवारी 2022 रोजी सकाळी ११.०० वाजता विशेष मकर संक्रांती यज्ञ केला जाणार आहे. उपस्थित राहण्यासाठी #क्रमांक: 9423061537.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar