देशात कायदेशीररीत्या 10 रुपयांची नाणी चलनात असतानाही गोव्यातील व्यावसायिक, विक्रेते, खासगी प्रवासी वाहने ती अवैध असल्याचे सांगत ग्राहकांना 10 रुपयांची नोटच देण्याचा तगादा लावत आहेत. हा प्रकार बंद होण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) या नाण्यासंदर्भात जारी केलेले निर्देशांचे पालन व्हावे, यासाठी प्रशासनाने पावले उचलावीत, अशा आशयाचे निवेदन हिंदु जनजागृति समितीने ‘सुराज्य उपक्रमांतर्गतअंतर्गत उत्तर गोवा अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. गोपाळ पार्सेकर यांना देण्यात आले. याप्रसंगी समितीचे सर्वश्री प्रमोद तुयेकर, भारत हेगडे आणि राज बोरकर उपस्थित होते. निवेदनात समितीने म्हटले आहे की, विक्रेते, दुकानदार यांच्याकडून 10 रुपयांचे नाणे अवैध असल्याची अफवा पसरवली जात आहे. यामुळे नागरिकांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. परिणामी 10 रुपयांचे नाणे असतानाही, नोट देण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय राहत नाही. जर ग्राहकाकडे केवळ नाणी असतील तर तो वस्तू खरेदी करू शकत नाही. यामुळे त्याला मनस्ताप सहन करावा लागतो, भारतीय चलन प्रणालीनुसार, ‘,आरबीआयने 2009 ते 2021 या कालखंडात 14 प्रकारची 10 रुपयांची नाणी चलनात आणली आहेत. ती सर्व नाणी वैध असल्याचे आर. बी. आय. ने प्रसिद्ध केले आहे. आरबीआयने 17 जानेवारी 2018 रोजी या संदर्भात एक प्रसिद्धी पत्रक जारी करून लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. १० रुपयांची नाणी स्वीकारण्यास नकार देणाऱ्या संबंधित दुकानदार, विक्रेते यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यास त्यांना शिक्षाही होऊ शकते, असेही आरबीआयने आपल्या निर्देशांमध्ये अगदी स्पष्ट केले होते. या संदर्भात सुराज्य अभियानने मागणी केली आहे की, 10 रुपयांची नाणी स्वीकारण्यासंदर्भातील ‘आर्.बी.आय.ने दिलेले आदेश सर्व दुकानदार आणि विक्रेते यांच्यापर्यंत पोचवावे, 10 रुपयांची नाणी न स्विकारणार्‍यांवर कारवाई करावी आणि नागरिकांना त्यांच्या हक्काची जाणीव करून द्यावी.

.

देशात कायदेशीररीत्या 10 रुपयांची नाणी चलनात असतानाही गोव्यातील व्यावसायिक, विक्रेते, खासगी प्रवासी वाहने ती अवैध असल्याचे सांगत ग्राहकांना 10 रुपयांची नोटच देण्याचा तगादा लावत आहेत. हा प्रकार बंद होण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) या नाण्यासंदर्भात जारी केलेले निर्देशांचे पालन व्हावे, यासाठी प्रशासनाने पावले उचलावीत, अशा आशयाचे निवेदन हिंदु जनजागृति समितीने ‘सुराज्य उपक्रमांतर्गतअंतर्गत उत्तर गोवा अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. गोपाळ पार्सेकर यांना देण्यात आले. याप्रसंगी समितीचे सर्वश्री प्रमोद तुयेकर, भारत हेगडे आणि राज बोरकर उपस्थित होते.
निवेदनात समितीने म्हटले आहे की, विक्रेते, दुकानदार यांच्याकडून 10 रुपयांचे नाणे अवैध असल्याची अफवा पसरवली जात आहे. यामुळे नागरिकांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. परिणामी 10 रुपयांचे नाणे असतानाही, नोट देण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय राहत नाही. जर ग्राहकाकडे केवळ नाणी असतील तर तो वस्तू खरेदी करू शकत नाही. यामुळे त्याला मनस्ताप सहन करावा लागतो, भारतीय चलन प्रणालीनुसार, ‘,आरबीआयने 2009 ते 2021 या कालखंडात 14 प्रकारची 10 रुपयांची नाणी चलनात आणली आहेत. ती सर्व नाणी वैध असल्याचे आर. बी. आय. ने प्रसिद्ध केले आहे. आरबीआयने 17 जानेवारी 2018 रोजी या संदर्भात एक प्रसिद्धी पत्रक जारी करून लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. १० रुपयांची नाणी स्वीकारण्यास नकार देणाऱ्या संबंधित दुकानदार, विक्रेते यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यास त्यांना शिक्षाही होऊ शकते, असेही आरबीआयने आपल्या निर्देशांमध्ये अगदी स्पष्ट केले होते. या संदर्भात सुराज्य अभियानने मागणी केली आहे की, 10 रुपयांची नाणी स्वीकारण्यासंदर्भातील ‘आर्.बी.आय.ने दिलेले आदेश सर्व दुकानदार आणि विक्रेते यांच्यापर्यंत पोचवावे, 10 रुपयांची नाणी न स्विकारणार्‍यांवर कारवाई करावी आणि नागरिकांना त्यांच्या हक्काची जाणीव करून द्यावी.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar