डिलायला लोबो यांच्या प्रचाराची फेरी

.

शिवोली मतदार संघातील सडये शिवोली, मार्ना शिवोली, ओशेल शिवोली, वेर्ला काणका, व आसगाव या पंचायत क्षेत्रातील घरोघरी प्रचार पुर्ण झाला असून हणजूण कायसूव या शेवटच्या पंचायत क्षेत्रात सध्या घरोघरी प्रचार सुरू आहे, करोना मुळे निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून मोजक्याच कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रचार करावा लागत आहे. जास्त समर्थक सोबत नेता येत नाहीत, प्रचारादरम्यान जनतेकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे, गेल्या 25 वर्षात शिवोली मतदार संघाचा काहीच विकास या अगोदरच्या आमदारांनी केला नसल्याचे लोक सांगतात, व आपणास या वेळेस निवडून आणण्याचे आश्वासन देतात असे काँग्रेस पक्षाचे उमेदवार डिलायला लोबो यांनी हणजूण पंचायत क्षेत्रात घरोघरी प्रचार करताना पत्रकारांना सांगितले.
हणजूण कायसूव पंचायत क्षेत्रात लोकांचा चांगला प्रतिसाद डिलायला लोबो यांना मिळत आहे. निवडणुकीला उभे राहिल्यानंतर त्यांनी पर्रा पंचायतीचे सरपंच पद सोडले पण येथील अपक्ष उमेदवार सावियो अल्मेदा हणजूण कायसूवचे सरपंच पद सोडायला तयार नाही अशी प्रतिक्रिया हणजूण कायसुवच्या पंचसदस्य शीतल दाभोलकर यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले.
भाजपाचे पराभूत उमेदवार दयानंद मांद्रेकर यांनी मतांचे विभाजन करण्यासाठी सावियो अल्मेदा यांना निवडणुकीला उभे केले आहे, अल्मेदा यांना मत म्हणजे भाजपाला मत याची जाणीव ठेवून मतदारांनी मतदान करावे, भ्रष्ट सरपंच म्हणून प्रसिद्ध असलेले सावियो अल्मेदा यांना सरपंच म्हणून पंचायत क्षेत्रात कोणतीही विकाकामे राबवता आली नाही ते मतदार संघाचा काय विकास साधणार असा टोमणा लोबो यांचे खंदे समर्थक तथा समाज कार्यकर्ते गजानन तिळवे यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar