शिवोली मतदार संघाचा अजूनही आपण आमदार आहे, त्यामुळे येत्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी सादर करणे क्रमप्राप्त

.

         शिवोली मतदार संघाचा अजूनही आपण आमदार आहे, त्यामुळे येत्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी सादर करणे क्रमप्राप्त ठरते म्हणून आपण 2022 या निवडणुकीला उभा राहणार कोणत्या पक्षातर्फे उमेदवारी सादर करणार किंवा अपक्ष राहणार हे येत्या दोन दिवसात सर्वांना समजेल अशी प्रतिक्रिया शिवोलीचे आमदार विनोद पालयेकर यांनी हणजूण येथे पत्रकारांकडे बोलताना दिली.
मागच्या वेळी आपण गेली 20 वर्षे केलेल्या विकासकामाच्या तसेच आपले दिवंगत बंधू उदय पालयेकर यांच्या सामाजिक योगदानाच्या जोरावर निवडून आलो होतो, गोवा फॉरवर्ड पक्षाने आपणाला फक्त सहकार्य केले होते. गोवा फॉरवर्ड पक्षाने ही शिवोलीची जागा काँग्रेस पक्षाला सोडल्याने आपल्याला वेगळा विचार करावा लागत आहे. गोवा फॉरवर्ड बद्दल आपल्याला काही बोलायचे नाही. आपण मुहूर्त पाहून सगळी कामे करतो, दोन दिवसानंतर आपण कोणत्या पक्षातर्फे निवडणूक लढवू ते आपणाला कळेल असे विनोद पालयेकर यांनी सांगितले. शिवोली मतदार संघात कोणीही निवडणूक लढवू देत, आपण सर्वांना सदिच्छा देतो असे पालयेकर यांनी सांगितले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar