सत्तेवर आल्यास आम्ही राज्य पातळीवर ओपिनियन

.

J

 

सत्तेवर आल्यास आम्ही राज्य पातळीवर ओपिनियन पोल दिवस साजरा करू: काँग्रेस

पणजी : ओपिनियन पोल दिवस हा गोव्याचा सर्वात महत्त्वाचा दिवस आहे, त्यामुळे तो दिवस राज्यस्तरावर साजरा केला पाहिजे, असे मत काँग्रेस नेते मायकल लोबो यांनी रविवारी व्यक्त केले. “आम्ही सत्तेवर आल्यास राज्य पातळीवर ओपिनियन पोल दिवस साजरा करू.” असे लोबो यांनी आश्वासन दिले.

काँग्रेस नेत्यांनी रविवारी पणजी कार्यालयात ओपिनियन पोल दिवस साजरा केला. यावेळी खासदार फ्रान्सिस सार्दिन, माजी केंद्रीय मंत्री एदुआर्द फालेरो, गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव, महिला अध्यक्षा बीना नाईक, ज्यो डायस, दिलीप बोरकर आदी उपस्थित होते.

“गोव्याची अस्मिता जपण्यासाठी लढलेल्या नेत्यांचा आपण आदर केला पाहिजे आणि त्यांचे स्मरण केले पाहिजे. सरकारने हा दिवस राज्यस्तरावर साजरा करावा, अशी माझी नेहमीच इच्छा होती. पण भाजपने ते कधीच ऐकले नाही.’’ असे लोबो म्हणाले.

फ्रान्सिस सार्दिन म्हणाले की, गोवा महाराष्ट्रात विलीन झाला असता तर फक्त एक जिल्हा म्हणून राहिला असता. गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण झाले असते तर आम्हाला आमदार, मंत्री आणि मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली नसती.

राज्य आणि लोकहिताच्या विरोधात काम करणाऱ्या भाजपचा पराभव करा, असे आवाहन त्यांनी गोव्यातील जनतेला केले.

एदुआर्द फालेरो यांनीही गोव्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगितले. “माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि काँग्रेसच्या इतर नेत्यांनी गोव्याचे हित जपण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती.” असे ते म्हणाले.

दिनेश गुंडू राव म्हणाले की, हा ऐतिहासिक दिवस असून तो साजरा करायला हवा. “गोव्याचा इतिहास, संस्कृती, भाषा आणि इतर पैलू अद्वितीय आहेत. पण गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण झाले असते तर ते सगळे नश्ट झाले असते.’’ असे राव म्हणाले.

“सर्वात महत्त्वाचे म्हणजे विलीनीकरण मागणाऱ्या आणि विलीनीकरणाच्या विरोधात असलेल्या दोन्ही गटांनी, जनमत कौल झाल्यावर राज्याच्या हितासाठी काम केले. ही देखील एक अनोखी गोष्ट आहे.” असे ते म्हणाले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar