हणजूण-वागातोर सारखे जगप्रसिद्ध समुद्र किनारे लाभलेला हा गाव विकासाच्या दृष्टीकोनातून

.
हणजूण-वागातोर सारखे जगप्रसिद्ध समुद्र किनारे लाभलेला हा गाव विकासाच्या दृष्टीकोनातून पाहिल्यासअद्याप मागासलेलाच आहे. ना चांगले रस्ते, ना सुरळीत पाणीपुरवठा, ना चांगले खेळाचे मैदान, लहान मुलांना खेळण्याबागडण्या साठी ना चांगले बाल-उद्यान, ना बालभवन चे केंद्र, जेष्ठासाठी ना वाचनालय, ना कदंब बस सेवा,  बस स्थानकासह ना सुसज्ज मार्केट कॉम्प्लेक्स, ना रुग्ण वाहिका, ना शववाहिका,ना चांगले आरोग्य केंद्र, तसेच विजेच्या लपंडावाची समस्या अश्या अनेक मूलभूत सुविधापासून हणजूण कायसूव येथील जनता अद्याप वंचित आहे.
        उत्तर गोव्यात उत्पन्नाच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या हणजूण कायसूव पंचायत क्षेत्रातील जनतेला चांगल्या सुविधा पुरवण्यास स्थानिक पंचायतीबरोबरच स्थानिक आमदारही अपयशी ठरले आहेत. यातील अनेक विकास कामाबद्दल हणजूण कायसुवाच्या जागृत नागरिकांनी गेल्या 20 वर्षापेक्षा जास्त झालेल्या प्रत्येक ग्रामसभेत ठराव घेऊन या विकासकामांची मागणी केली होती पण पंचायतीने या ठरावावर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून ठरावांना केराची टोपली दाखवली, सततच्या मागणी नंतर काही ठरावाबाबत पंचायतीने पत्रव्यवहाराचे नाटक करून कागदी घोडे नाचवले.
        नाही म्हणायला पंचायतक्षेत्राचा विकास झाला तो बांधकाम क्षेत्रात.किनारी भागात तसेच अंतर्गत भागात मोठमोठी हॉटेल आस्थापने झाली, दोन मोठी पंचतारांकित हॉटेल प्रकल्प सुद्धा सुरू झाले तर आणखी एक सुरू होण्याच्या मार्गांवर आहे. मोठ मोठे हॉटेल प्रकल्प सुरू होऊनही हणजूण कायसूव पंचायत स्थानिक बेरोजगारांना नोकऱ्या देण्यास असमर्थ ठरले.बेरोजगाराची समस्या निर्माण करणारे आता निवडणुकीच्या काळात नोकऱ्या देण्याची पोकळ आश्वासने देत आहेत.
         या पंचायत क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून कादंबा बस सेवा नसल्याने ग्रामस्थांना तसेच शाळा कॉलेजच्या विध्यार्थ्यांना बेभारोशाच्या खाजगी बस सेवेवर अवलंबून रहावे लागत आहे.1994 मध्ये वागातोर येथे बांधण्यात आलेल्या सरकारी आरोग्य दवाखान्याचा दर्जा वाढवण्याकरिता प्रयत्न करावा अशी मागणी अनेक ग्रामसभातून करण्यात आली पण पंचायतीने गेल्या दोन वर्षांपूर्वी पत्रव्यवहाराचे फक्त नाटक केले.लहान मुलांसाठी बालोद्यान पंचायती मार्फत करावे अशी अनेक वर्षापासूनची मागणी असताना सरपंचाने निवडणूक डोळ्यासमोर ठेवून चर्च च्या खाजगी जागेत बांधकाम व्यवसायिकाच्या सहकार्याने आपल्या नावे बालोद्यान बांधले जे गावातील सर्वसामान्य मुलांना गैरसोईचे ठरले. मुलांना दिवाळी व उन्हाळी सुट्टीत घेण्यात येणारे बालभवनचे वर्ग पंचायत क्षेत्रात सुरू करण्याकरिता पंचायतीने प्रयत्न करावेत म्हणून अनेकदा मागणी करून ठरावही घेण्यात आले पण फक्त बांधकाम परवाने देण्यात व्यस्त असलेल्या पंचायतीने पंचायत क्षेत्राच्या विकासाकडे कधीही लक्ष दिले नाही.येथील भटक्या गुरांची व भटक्या कुत्र्यांची समस्या जैसे थे आहे.
         काही वर्षांपूर्वी पंचायत क्षेत्रात जागोजागी कचऱ्याचे ढीग जमा झाले होते, वर्तमान पत्रातून लोकांच्या नजरेस आणून दिल्यानंतर काही जागृत स्थानिकांनी कोर्टात धाव घेतली, कोर्टाने याचिकेची दखल घेऊन पंचायतीला कचऱ्याची समस्या त्वरित सोडवण्याचे आदेश दिले व तो पर्यत बाहेरील कोणालाही बांधकाम परवाने देऊ नये असे निर्देश दिले. बांधकाम परवान्याच्या फायली साचून राहिल्याने पंचायतीला पंचायत क्षेत्रात साफसफाई मोहीम राबवावी लागली, त्याचेच फळ म्हणून स्वच्छ पंचायत म्हणून एकमात्र शाबासकी हणजूण कायसूव पंचायतीला मिळाली ज्याचा उल्लेख सरपंच सदोदित करून स्वतःचीच पाठ थोपटतात.
        गेली पंधरा वर्षे सत्ता हातात असूनही विकासकामाकडे दुर्लक्ष करणारे हणजूण कायसूव पंचायतीचे सरपंच तसेच शिवोली मतदार संघांचे आजी माजी आमदार विकास कामांची आश्वासने देत पुन्हा 2022 च्या निवडणूक रिंगणात उतरले आहेत, निवडणुकीनंतर तरी हणजूण कायसूव गावाचा उद्धार होतो की नाही हे येणारा काळच ठरवेल.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar