म्हापसा शहरात अजूनही माकैट मधील लहान व्यवसायीक बंदी घालण्यात आलेल्या ४० मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्याचा वापर मोठ्या

.

म्हापसा शहरात अजूनही माकैट मधील लहान व्यवसायीक बंदी घालण्यात आलेल्या ४० मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्याचा वापर मोठ्या


प्रमाणात करताना दिसतात. या बारीक पातळ पिशव्यामुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असताना म्हापसा शहरातील लहान  व्य वसाय करणारे फळे व भाजीविक्रेतेवाले प्लास्टिक पिशव्याचा वापर करताना दृष्टीस पडतात आणि याचे पालीकेचे नियंत्रणही नाही

म्हापसा पालिका या गोष्टीकडे का बरे दृलक्ष करते असा सवाल पर्यावरण प्रेमी उठवत आहे. मागच्या वर्षी गांधी जयंती पासून सरकारने प्लास्टिक पिशव्यावापरणावर बंदी घातली असताना याचा वापर कसा अजूनही होतो याकडे पालिका अजूनही लक्ष देत नाही
म्हापसा पालिकेने प्लास्टिक पिशव्या वापरण्यारावर बंदी आणावी वा त्यांना दंड आकारावा अशी मागणी काही पर्यावरण प्रेमींनी केली आहे
लोकांनीही पर्यावरणाचा ह्यस रोखण्यासाठी या प्लास्टिक पिशव्याचा कमीत कमी करावा जेणेकरून निर्सगाची हानी होणार नाही याकडे लक्ष देण्याची गरज आहे
म्हापसा शहरात नजर टाकली असता प्लास्टिक पिशव्या विखुरलेल्या दिसतात,गूरे या प्लास्टिक  पिशव्यातील खाध्य पिशव्या सकट खाताना आढळतात परीणामी त्याच्या पोटात हे प्लास्टिक गेलामुळे गुरें दगावतात
गुराप्रमाणे भटकी कुत्रीही या पिशव्यातील अनपदाथावर ताव मारताना दृष्टीस पडतात.म्हापसा नगरपालीकेने प्लास्टिक पिशव्याबाबत लोकांमध्ये जागृती करावी व जे लहान व्यवसायीक प्लास्टिक पिशव्या वापरतात त्याचावर दंडामक कारवाई करावी अशी मागणी म्हापसा शहरातील पर्यावरणप्रेमींनी केली आहे. म्हापसा शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी लोकांनीही हातभार लावला तरच हे शक्य आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें