कोलवाळ पोलिसांनी वरचावाडा, कोलवाळ येथे धाड घालून बेकायदेशीर रित्या साठा करून ठेवलेला रु.69464/- रुपयांचा दारूचा साठा जप्त केला.
कोलवाळ पोलीस निरीक्षक सोमनाथ माजिक यांनी दिलेल्या माहिती नुसार वरचावाडा, कोलवाळ येथील एका घरात मद्य साठा असल्याची माहिती मिळाल्यानंतर दि.21 रोजी निरीक्षक माजिक यांच्या सोबत उपनिरीक्षक मंदार परब, हवालदार रामा नाईक, प्रताप सावंत, पोलीस शिपाई सुलेश नाईक, साजो देसाई, व होमगार्ड रितेश गावस यांनी उपधिक्षक उदय परब यांच्या मार्गदर्शनाखाली धाड टाकून सुमारे 255.555 लिटर वेगवेगळ्या बनवटीच्या दारूच्या बाटल्या पंचनामा करून जप्त केल्या. जप्त केलेला मद्य साठा त्यानंतर अबकारी खात्याकडे सुपूर्द करण्यात आला.