हणजूण पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी केलेल्या कारवाईत एका स्थानिक युवकास अटक करून त्याचेकडून रु.48000/- किंमतीचा वेगवेगळ्या तऱ्हेचा अंमली पदार्थ जप्त केला. ही कारवाई दि.23 रोजी पहाटे 1 ते 4.15 या वेळेत करण्यात आली.
मिळालेल्या माहिती नुसार देऊळवाडा शापोरा येथे एक युवक अंमली पदार्थ विक्री करिता आला असल्याची खबर मिळाल्यावर निरीक्षक प्रशाल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हणजूण पोलीस पथकाने त्या ठिकाणी धाड टाकली असता बाबली प्रेमानंद परब (24) रा. गाववाडी, हणजूण हा युवक संशयास्पद रित्या घुटमळताना आढळला, त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याचेकडे 0.60 ग्राम वजनाचा एमडीएमए ( रु.18000/-), 0.98 ग्राम कोकेन ( रु.1500/-), व 0.55 ग्राम इकटासी ( रु.15000/-) हा अंमली पदार्थ सापडला. पंचनामा करून हणजूण पोलिसांनी बाबली परब यांचे विरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कायद्याखाली गुन्हा नोंद करून अटक केली.