काँग्रेस स्थिर सरकार स्थापन करेल: पी चिदंबरम

.

 

काँग्रेस स्थिर सरकार स्थापन करेल: पी चिदंबरम

पणजी: काँग्रेसचे वरिष्ठ निरीक्षक पी. चिदंबरम यांनी रविवारी सांगितले की, काँग्रेसला स्थिर सरकार स्थापन करण्यासाठी बहुमत मिळेल असा विश्वास आहे कारण लोकांनी तसा पाठिंबा दिला आहे आणि लोक काँग्रेस बरोबर आहेत.

त्यांनी निदर्शनास आणून दिले की भाजपने जे काँग्रेस बरोबर केले तेच आतां त्यांच्या बरोबर घडत आहे. ‘ त्यांचे नेते त्यांना सोडून जात आहेत. यासाठी म्हणतात ना, की भाजपने पेरलेले विष आता विषाच्या रूपात वर येत आहे आणि हे सध्याच्या राजकिय घडामोडींवरून स्पष्ट झाले आहे.’’

काँग्रेसचे उमेदवार एकसंध राहतील आणि सरकार चालवतील, असे ते म्हणाले. ‘‘गोव्याचा मागचा इतिहास पाहता हे महत्त्वाचे आहे. काँग्रेस पक्ष एकजुटीने लढेल आणि आम्हाला आशा आहे की गोव्यातील लोक आमच्यावर विश्वास ठेवतील.’’ असे ते म्हणाले.

काँग्रेसचे वरिष्ठ निरीक्षक पी. चिदंबरम यांनी पणजीत पत्रकार परिषद घेवून गोव्यातील जनता काँग्रेससोबत असल्याचे सांगितले. यावेळी गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव, गोवा प्रदेश काँग्रेस सामितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर आदी उपस्थित होते.

या वर्षीच्या ’बीटिंग रिट्रीट सोहळ्यातील’ सुरांच्या यादीतून महात्मा गांधीजींचे आवडते पारंपारिक ख्रिश्चन भजन ‘अबाइड विथ मी’ वगळल्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना, चिदंबरम म्हणाले की यामुळे देशातील लोक दुखावले आहेत.

ही धून 1950 पासून दरवर्षी वार्षिक समारंभात वाजवली जाते.

“महात्मा गांधीजींनी हे धर्मनिरपेक्ष भजन लोकप्रिय केले होते. ते या सोहळ्यात वाजवायला हवे. ” असे चिदंबरम म्हणाले.

एका प्रश्नाला उत्तर देताना चिदंबरम म्हणाले की, भाजपने काँग्रेससोबत जे केले आता त्यांनाच ते भोगावे लागत आहे. ‘त्यांचे नेते त्यांना सोडून जात आहेत.’’ असे ते म्हणाले.

सर्व उमेदवारांना विश्वासात घेऊन मुख्यमंत्र्यांचा नाव जाहीर केले जाईल, असे ते म्हणाले. “मुख्यमंत्र्यांचे नाव आता जाहीर करायचे की नंतर ते आम्ही ठरवू.” असे ते म्हणाले.

चिदंबरम म्हणाले की, काँग्रेस पक्षाला मिळत असलेला पाठिंबा पाहता लोक त्यांना स्थिर सरकारसाठी बहुमत देतील

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar