कळंगुटचे माजी सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला .

.

 

 

पणजी : कळंगुटचे माजी सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला . भाजपाचे माजी आमदार मायकल लोबो यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी भाजपला मजबूत उमेदवार नव्हता. मात्र सिकेरा यांच्या रूपाने भाजपला कळंगुटमध्ये मजबूत उमेदवार मिळालेला आहे. सिक्वेरा हे कळंगुट पंचायतीचे अनेक वर्षे सरपंच होते. मागील विधानसभा निवडणुकी ते काँग्रेसचे उमेदवार होते. कळंगुट मतदारसंघांमध्ये त्यांचा मोठा चाहतावर्ग व मतदार आहेत . त्यामुळे कळंगुट सर करण्यास सिक्वेरा यांच्या रूपाने भाजपच्या हाती एक मजबूत मोहरा लागला आहे .

मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, भाजपाचे प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो , आमदार ग्लेन टिकलो, माजी मंत्री दयानंद मांद्रेकर , माजी मंत्री दिलीप परुळेकर, काळंगुट भाजपाचे नेते गुरुदास शिरोडकर आदींच्या उपस्थितीत सिक्वेरा यांना पणजी येथील भाजपच्या प्रचार कार्यालयात आयोजित कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला.

त्याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की जोसेफ सिक्वेरा च्या रूपाने भाजपला एक चांगला नेता गवसला आहे. गोव्याच्या विकासासाठी जे जे लोक भाजपमध्ये दाखल होतील त्या सर्वांचे स्वागत आम्ही करत आहोत . गोव्याच्या आणि कळंगुटच्या विकासासाठी सिक्वेरा यांनी उचललेले पाऊल योग्य ठरणार आहे. माजी मंत्री मायकल लोबो यांना कळंगुट व शिवोली येथील नागरिक प्रथम नव्हे तर त्यांची पत्नी प्रथम आहे. तर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना देश प्रथम आणि त्यानंतर स्वतःचे हित असते. लोबो यांना आपण मंत्री केले मात्र मंत्रिपदाचाचा योग वापर ते कळंगुटच्या विकासासाठी करू शकले नाहीत. पत्नीला उमेदवारी मिळावी या स्वार्थापोटी ते काँग्रेसमध्ये दाखल झालेत. अशा या स्वार्थी नेत्याला कळंगुट आणि शिवोलुचे मतदार माफ करणार नाहीत असे मुख्यमंत्री म्हणाले . भाजप सरकारने गोव्याचा भरीव विकास केला असून तो विकास लोकासमोर आहे. आणि त्यामुळे
२०१२ मध्ये भाजपला २१ जागा मिळाल्या होत्या. यावेळी २२ पेक्षा जास्त जागा मिळणार असून त्यामध्ये कळंगुटची जागा असेल. असेही मुख्यमंत्री म्हणाले.
वाहतूक मंत्री मावीन गुद्धीनो यांनी लोबो यांच्यावर जोरदार टीका करत सांगितले की भाजप सरकारने त्याला कचरा व्यवस्थापन खात्याचे मंत्री केले. मात्र त्यांच्याकडे राज्यातील कचरा सुव्यवस्थितपणे नष्ट करणे जमले नाही. तो कचरा घेऊन ते कॉंग्रेसमध्ये गेलेत आणि त्यांच्या हाती फक्त राखच येणार असल्याचेही गुध्दीनो म्हणाले .
सिक्वेरा हे चांगले नेते असून कळंगुट मतदारसंघांमध्ये त्यांचा चांगला वरचष्मा आहे. सरपंच म्हणून त्यांनी अनेक वर्षे लोकांची सेवा केलेली आहे. भाजप सरकारने केलेला विकास लोकांसमोर आहे. रस्त्यांचे जाळे विकास प्रकल्पांचे जाळे आणि एकूणच गोव्याचा झालेला भरीव विकास तसेच केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या रूपाने देशाला एक उत्कृष्ट पंतप्रधान लाभले आहेत. त्यांच्या कडून देशाचा झालेला विकास लोकासमोर आहे. या सर्वांच्या बळावर येत्या निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा सत्तेवर येईल. असे गुध्दीनो म्हणाले. लोबो पत्नीला उमेदवारी मिळत नाही म्हणून भाजप सोडून गेले. मात्र त्यांना पश्चाताप करावा लागणार असल्याचे सांगून सिक्वेरा एक चांगले उमेदवार आहेत. असे गुध्दीनो म्हणाले. मायकल लोबो यांनी टेक्सी चालकांची नेहमीच दिशाभूल करून त्यांना संकटात टाकले आहे . ते थेट आपल्याकडे येऊ नयेत यासाठी लोबो यांनी मध्यस्थी करून उलट टॅक्सी चालकांना त्रासात टाकले . त्यामुळे टॅक्‍सी चालक लोबो यांना यावेळी मतदान करणार नाहीत . असा विश्वास गुध्दीनो यांनी यावेळी व्यक्त केला .

या प्रसंगी बोलताना तानावडे यांनी सांगितले की कळंगुट मध्ये जोसेफ सिक्वेरा यांच्या रूपाने भाजपला एक चांगला नेता मिळाला असून येत्या निवडणुकीत कळंगुटमध्ये नक्कीच भाजपचा झेंडा पुन्हा एकदा फडकणार आहे.
सिक्वेरा म्हणाले की २०१२ साली पहिल्यांदा मायकल लोबो यांना उमेदवारी द्यावी यासाठी दयानंद मांद्रेकर, दिलीप परुळेकर आणि माजी आमदार फ्रान्सिस डिसोझा यांनी प्रयत्न केले. आपणाला त्यांनी विनंती केली म्हणून आपण मायकल लोबो यांना पाठिंबा दिला. आणि कळंगुट मधून पहिल्यांदा निवडून आणले . मात्र २०१७ च्या दुसऱ्या निवडणुकीत लोबो यांनी दयानंद मांद्रेकर आणि दिलीप परुळेकर यांच्या पाडावासाठी प्रयत्न केला. आपणास त्रास केला. असा स्वार्थी नेता कोणाचेही भले करू शकणार नाही. असे सिक्वेरा म्हणाले. ज्यांनी आमदार केले त्यांच्या पराभवासाठी वावरणाऱ्या नेता लोबो असल्याचे सांगून त्यांची मानसिक स्थिती ठीक नसल्याची टीका यावेळी सिक्वेरा यांनी केली.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar