राज्य नाट्यस्पर्धेत साखळीत १ फेब्रुवारी रोजी”अधांतर’

.

राज्य नाट्यस्पर्धेत साखळीत १ फेब्रुवारी रोजी”अधांतर’

कला अकादमीच्या सध्या रवींद्र भवन साखळी येथे सुरु असलेल्या” ब “गट मराठी राज्यनाट्यस्पर्धेत उद्या मंगळवार दि १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वा . सातेरी कलामंदीर,हसापुर ,गोवा प्रस्तुत “अधांतर” या नाटकाचा प्रयोग सदर केला जाणार आहे.
प्रसिद्ध नाटककार कै. जयंत पवार यांनी लिहिलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन गोविंद नाईक यांनी केले असून या नाटकात गोविंद(गोट्या) नाईक,अरविंद नाईक,प्रजय मळीक,संकल्प नाईक,हर्ष मळीक,विष्णू नाईक,अंकिता गवस ,मैथिली मराठे,अनघा आजगावकर , निलेश नारायण नाईक व निवेदिता चंद्रोजी हे कलाकार सहभागी होतील, नाटकाचे पार्श्वसंगीत जवाहर बर्वे यांचे असून ,प्रकाश योजना सुंदर कार्बोटकर यांची असेल,नेपथ्य संकल्पना गार्गी दीपक बर्वे यांची तर रंगभूषा भास्कर म्हामल ,वेशभूषा श्रुती देसाई यांची असेल,रंगमंच साहाय्य रितेश नाईक। ,सावळाराम नाईक ,संजय नाईक यांचे आहे .
या पूर्वी या संस्थेने राज्यनाटय स्पर्धेत सूर राहू दे, मोरूची मावशी षडयंत्र,वन टू का फोर या नाटकांचे यशस्वी व प्रभावीपाणे सादरीकरण करून कलाकारांनी वैयक्तिकव सांघिक पारितोषिके पटकावली आहेत .अधांतर हे या संस्थेचे महात्वाकांशी नाटक असून चोखंदळ रसिक प्रेक्षकांनी नाटकाला उपस्थिती लावावी अशी विनंती संस्थेने केली आहे प्रवेशिका रवींद्र भवन येथे प्रयोग दिवशी उपलब्ध असतील.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें