एनएसयुआयचे मोफत शिक्षण, इंटरनेटचे आश्वासन

.

एनएसयुआयचे मोफत शिक्षण, इंटरनेटचे आश्वासन

पणजी: एनएसयूआय गोवा शाखेने मंगळवारी पणजी येथे कार्यालय उघडले आणि त्यानंतर जाहिरनाम्यातून पदवीपर्यंत मोफत शिक्षण देण्याचे आश्वासन दिले.

माजी केंद्रीय कायदा मंत्री अॅड. रमाकांत खलप यांनी कार्यालयाचे उद्घाटन केले. यावेळी काँग्रेसचे पणजीचे उमेदवार ॲल्विस गोम्स, एनएसयूआयचे राष्ट्रीय अध्यक्ष नीरज कुंदन, एनएसयूआय, गोवा अध्यक्ष नौशाद चौधरी आदी उपस्थित होते.

मोफत शिक्षण बरोबर, मोफत सार्वजनिक वाहतूक, क्रीडा विद्यापीठ, कॅम्पस मुलाखती आणि जॉब फेअर, विद्यार्थी अयोग, इंटरनॅशनल एक्स्चेंज प्रोग्राम, विद्यार्थ्यांना लॅपटॉप आणि स्मार्टफोन आणि मोफत इंटरनेट कनेक्टिव्हिटी ही आश्वासन दिली आहे.

रमाकांत खलप यांनी एनएसयूआय सदस्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, एनएसयूआयने जाहीरनाम्यात सर्व महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत.

एल्विस गोम्स म्हणाले की, विद्यार्थी समुदायाने योग्य मुद्द्यांवर भर दिला आहे आणि त्यांच्या कल्याणासाठी त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे.

नीरज कुंदन म्हणाले की, भाजप सरकार गोव्यातील विद्यार्थी आणि तरुणांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले आहे.

“केवळ गोव्यातच नाही तर संपूर्ण देशभरात विद्यार्थ्यांच्या सर्व प्रश्नांकडे भाजप सरकारने
दुर्लक्ष केले आहे.‘ असे कुंदन म्हणाले.

” भाजप विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात अपयशी ठरला.” असे ते म्हणाले.

ते म्हणाले, “निवडणुकीच्या सर्व ५ राज्यांपैकी गोव्यात बेरोजगारी वाढली आहे. ‘‘भाजप सत्तेत आल्यापासून राज्याची शैक्षणिक संरचनाही ठीक नाही.’’ असे ते म्हणाले.

“एनएसयूआय गोव्यातील लोकांपर्यंत घरोघरी जाऊन जाहिरनाम्यातील संदेश पोहोचवेल. गोव्यात काँग्रेसचे सरकार आल्यावर ही सर्व आश्वासने पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.’’ असे ते म्हणाले.

नौशाद चौधरी म्हणाले की, भाजप सरकारने विद्यार्थी समुदायाच्या प्रश्नांना बगल देऊन त्यांच्यावर अन्याय केला आहे. “भाजप सरकार आमच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यात अपयशी ठरले आहे. आमचे प्रश्न सोडवण्याऐवजी आम्ही ऑनलाइन परीक्षांची मागणी करत असताना त्यांनी आमच्यावर लाठीचार्ज केला.’’ असे चौधरी म्हणाले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar