प्रजासत्ताक दिनानिमित्त, रोटरी क्लब ऑफ म्हापसा एलिट आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ म्हापसा, यांनी मार्शल आर्ट्स अकादमी, गोवा, यांच्या संयुक्त विद्यमाने २६ जानेवारी रोजी म्हापसा येथे मोफत स्वसंरक्षण कार्यशाळा आयोजित केली होती.

.

प्रजासत्ताक दिनानिमित्त, रोटरी क्लब ऑफ म्हापसा एलिट आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ म्हापसा, यांनी मार्शल आर्ट्स अकादमी, गोवा, यांच्या संयुक्त विद्यमाने २६ जानेवारी रोजी म्हापसा येथे मोफत स्वसंरक्षण कार्यशाळा आयोजित केली होती. या मोफत कार्यशाळेचा ५० हून अधिक जणांनी लाभ घेतला. श्री. सीताकांत कामत आणि मार्शल आर्ट अकादमीची टीम सदर कार्यशाळेसाठी मार्गदर्शक होती.

उद्घाटन कार्यक्रमाला डॉ. प्रतीक्षा खलप (अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ म्हापसा एलिट); श्री. अमेय वरेरकर (अध्यक्ष, रोटरॅक्ट क्लब ऑफ म्हापसा); श्री. सीताकांत कामत (सेल्फ डिफेन्स ट्रेनर); इतर रोटरी सदस्य – श्री. नंदकिशोर आरोलकर, श्री. प्रकाश पिळणकर, श्री. उदय रेडकर, श्री. रुपेश शेट्ये, श्री. शांत गुडनवार, इतर रोटरॅक्टर; आणि मार्शल आर्ट्स अकादमीचे सह-प्रशिक्षक – श्रीमती माया कामत आणि श्रीमती आस्था कामत.

या कार्यशाळेद्वारे सर्वांना असा संदेश जातो की – “आत्मसंरक्षण हा केवळ आपला अधिकार नाही तर आपले कर्तव्य आहे.” स्व-संरक्षणाचे प्रशिक्षण आपल्याला स्वतःचे आणि इतरांचे संरक्षण करण्यास मदत करते. हे केवळ संरक्षणासाठी नाही तर शारीरिक तंदुरुस्ती, आत्मविश्वास आणि आत्म-सन्मान वाढविण्यास देखील मदत करते.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar