श्री. शांता विद्यालयामध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात
प्रजासत्ताक दिन म्हणजे प्रगतीचा दिवस . लोकशाहीचा उदघोषाचा दिवस .या महत्वाच्या दिवशी देशासाठी देशहितकारक कार्य करण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे आणि त्याप्रमाणे वागलं पाहिजे तरच आपण खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक दिन साजरा केलं असं होईल. असे प्रतिपादन मुख्याध्यापिका सौ. प्रजिता सांगाळे यांनी केले.विद्याभारती संचालित श्री. शांता विद्यालयामध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी ते शाळेच्या मुख्याध्यापिका या नात्याने बोलत होत्या. तसेच या कार्यक्रमाला शाळेचे व्यवस्थापक श्री.शिवाजी पाटील ,शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेचे पूजन व मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहणाने करण्यात आले. सर्व शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी ध्वजगीत सादर करून
तिरंगी झेंड्याला आदर व्यक्त केला. या दिनाचे औचित्य साधून शिक्षक वर्गाने मेरा मुल्क मेरा देश हे देशभक्तीपर गीत सादर करून आपल्या देशाबद्दल कृतज्ञता भाव व्यक्त केला.
तसेच विद्यार्थी कु.शर्वाणी पेडणेकर हिने प्रजासत्ताक दिनाचे महत्व विषद केले.
तसेच प्रजासत्ताक पोवाडा दिनविशेष यावर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली या स्पर्धेमध्ये शाळेतील विद्यार्थी कुमारी आफ्रीन खान पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले तर विद्यार्थिनी कुमारी मुस्कान म्हणत की हिला दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले व विद्यार्थी कुमार सुशील कुमार यांना तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका कु. रक्षंदा आमोणकर यांनी केले. मान्यवरांचे स्वागत शिक्षिका सौ.विषया आमणेकर गवस यांनी केले व आभार प्रकटन शिक्षक श्री.उमेश महालकर यांनी केला.