आजादी का अमृत महोत्सव याचे औचित्य साधून प्रजासत्ताक दिनी पतंजली योग समीती पेडे म्हापसा, राष्ट्रीय योग फेडरेशन, गीता परिवार, क्रिडाभारती व हार्ट फुलनेस यांच्या विधमाने म्हापसा येथील लोहिया गार्डन येथे सामुदायिक सूर्य नमस्कार घालण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन पतंजली योग समीती पेडे म्हापसा यांनी केले होते
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलित करून करण्यात आली. यावेळी भारत स्वाभिमान चे अध्यक्ष कमलेश बांदेकर, जेष्ठ योग शिक्षक संदीप मोरजकर , पतंजली योग समीती गोवा राज्या प्रभारी विश्वास कोरगांवकर, पतंजली योग समीती संरक्षक राघव शेट्टी, किसान पंचायत सहप्रभारी तुळशीदास मंगेशकर, सत्यम कोसंबी, पत्नी युवा अध्यक्ष गिरीश परुळकर आदी उपस्थित होते. कमलेश बांदेकर यांनी सूर्यनमस्कार चै महत्व विशद केले. संदीप मोरजकर यांनी प्राणायाम व त्याचे महत्त्व समजावून सांगितले. व तद्नंतर सर्वांकडून करवून घेतले
यावेळी उपस्थित साधकांनी १३ ते १०८ सामुदायिक रीत्या सूर्यनमस्कार घालून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धेश राऊत यांनी केले. अशोक साळगावकर यांनी प्रास्ताविक केले तर डॉ. अरूंधती सडेकर यांनी