.

मांद्रे मतदारसंघातून अपक्ष निवडणूक उमेदवारी दाखल करण्यापूर्वी माजी मुख्यमंत्री तथा हरमलचे सुपुत्र लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी ग्रामदेव श्री रवळनाथ व ग्रामदेवी श्री भूमिका देवीचा आशिर्वाद श्रीफळ व पुष्पहार अर्पण करून घेतले. यावेळी देवस्थानचे ब्राह्मण श्री जनार्दन भट यांनी निवडणुकीत यश व पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळो असे गाऱ्हाणे व विनवणी श्रीचरणी केली.

कालच्या कार्यक्रमास त्यांच्या पत्नी स्मिता,कन्या शांभवी नाईक पार्सेकर, पुत्र ऋषिकेश तसेच माजी जीपं सदस्य अरुण बांधकर,हरमलच्या पंच प्रतिक्षा नाईक,जगन्नाथ पार्सेकर, विर्नोडाचे ऍड सीताराम परब,सुदन वायंगणकर,संजय तारी, अभय नाईक आदी शंभरेक कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी मतदारसंघातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.मांद्रे मतदारसंघात भाजपची उमेदवारी मिळेल ह्या आशेने माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व त्यांचे समर्थक कार्यकर्ते होते.मात्र भाजप श्रेष्ठीनी विद्यमान आमदार दयानंद सोपटे यांना भाजपची अधिकृत उमेदवारी जाहीर केली व कार्यकर्ते निराश झाले.अशावेळी कार्यकर्त्यानी माजी मुख्यमंत्री पार्सेकर याना बैठक घेण्यास भाग पाडले व अपक्ष उमेदवारीची गळ घातली.कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला व भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा शनिवार 22 जानेवारीला दिला.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांना भाजपची उमेदवारी डावलल्याने सहानुभूती मिळण्याची शक्यता आहे.2017 च्या निवडणुकीत ज्या कार्यकर्त्यानी परिश्रम घेतले होते,त्यापेक्षा दुप्पट प्रयत्न ह्या निवडणुकीत करण्याची गरज आहे. किंबहुना प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या तोडीसतोड ‘दाम व काम’ मार्गाचा अवलंब करण्याची गरज असल्याची चर्चा होत आहे.ह्या निवडणुकीत मांद्रे मतदारसंघात तिरंगी लढतीची शक्यता असून गोव्यातील राजकीय विश्लेषकांचे विशेष लक्ष लागून राहिले असून त्यापेक्षा दिल्लीच्या पातळीवर सुद्धा ह्या निकालाकडे लक्ष केंद्रित असेल,अशी चर्चा

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें