भारतीय जनता पक्षाचे पणजी मतदारसंघाचे उमेदवार आमदार बाबूश मोन्सेरात यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

.

पणजी : भारतीय जनता पक्षाचे पणजी मतदारसंघाचे उमेदवार आमदार बाबूश मोन्सेरात यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यासोबत भाजपाचे प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे , महापौर रोहित मोन्सेरात, भाजपाचे पणजी मंडळ अध्यक्ष नगरसेवक शुभम चोडणकर आदी नेते उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना मोन्सेरात यांनी सांगितले की पणजीच्या लोकांना कोण लोकप्रतिनिधी हवा याची त्यांना जाणीव आहे . त्यामुळे मतदानाद्वारे ते योग्य तो निर्णय घेतील. आपण आपले काम करत असून पणजीच्या विकासासाठी शक्य ते सर्व प्रयत्न गेल्या अडीच वर्षांमध्ये केलेले आहेत. भारतीय जनता पक्षाचे काम , राज्याचा झालेला विकास आणि आपले काम याच्या बळावर आपण लोकांना आपणास मते देण्याचे आवाहन करत असल्याचे सांगून उत्पल पर्रीकर किंवा इतर कोणीही निवडणूक लढवत असले तरी तो त्यांचा हक्क असून आपण कोणालाही कमजोर उमेदवार समजत नाही . सर्वच मजबूत उमेदवार आहेत. मात्र पणजीचे लोकच काय तो निर्णय घेणार असल्याचे मोन्सेरात म्हणाले .आपले ध्येय लोकांची सेवा करणे हे असून पणजीचे लोक आपल्याला नक्कीच पाठिंबा देतील असेही ते म्हणाले .
गोवा भरातील सर्व मतदारसंघात भाजपाचे उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. ४० ही मतदारसंघात भाजपा निवडणूक लढवत आहे . केंद्र सरकारचे काम व गोवा सरकारचे काम आणि गोव्याचा झालेला भरीव विकास याच्या बळावर पुन्हा एकदा गोव्यात भाजपाचे सरकार सत्तेवर येणार असल्याचेही यावेळी तानावडे म्हणाला.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar