म्हापसा :ज्या भूमीत आपण जन्म घेतला त्या भूमीत कर्म करण्याची संधी आपणास मिळावी म्हणून आपण हळदोणा मतदार संघातून निवडणुकीचा अर्ज सादर केला आहे, हळदोणातील लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवला आहे. येथील लोकांच्या ज्या काही अपेक्षा आकांशा असतील उदा. नोकरीं व्यवसाय व इतर त्या पूर्ण करणार, हळदोणाचा विकास हेच आपले ध्येय आहे असे हळदोणाचे तृणमूल काँग्रेस चे उमेदवार किरण कांदोळकर यांनी सांगितले.
म्हापसा येथे उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. निवडून आल्यानंतर आपण लोकांची मते चोरून दुसऱ्या पक्षाला साथ देणार नाही असे वचन आपण आज देतो. येत्या काही दिवसात तृणमूल काँग्रेस पक्ष विसर्जीत केला जाणार असल्याची अफवा आहे अश्या तृणमूल काँग्रेस पक्षाच्या अफ़वावर लोकांनी विश्वास ठेवू नये असे आवाहन किरण कांदोळकर यांनी यावेळी केले.