शिवोली मतदारसंघाचे माजी मंत्री तथा अपक्ष उमेदवार विनोद पालयेंकर यांचा घरोघरी प्रचार

.

म्हापसा दि. 27 ( प्रतिनिधी )

शिवोली मतदारसंघाचा गेली पाच वर्षे आमदार तथा अडीच वर्षे मंत्री म्हणून कार्यरत असतांना शिवोली मतदार संघाबरोबरच राज्यातही अनेक विकास कामे मार्गी लावली परंतु केलेल्या कामांचा कधीच उदोउदो केला नाही मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत स्थांनिकांबरोबरच मतदारसंघा बाहेरिल उमेदवार शिवोलीत तळ ठोकून असल्याने मी माझ्या विकास कामांची माहिती पुस्तिका घरां-घरांत पोहोचविण्यास सुरुवात केलेली असून मला सर्वत्र उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे शिवोलीचे माजी आमदार तथा माजी मंत्री तसेच अपक्ष उमेदवार विनोद पालयेंकर यांनी सांगितले.
कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतांना परमेश्वरी कृपेनें तसेच जनतेच्या पाठींब्यामुळे प्रथमच शिवोलीचा आमदार बनलो पाच वर्षे विविध विकास कामे राबविली, पंचवीस वर्षे रखडून पडलेल्या शिवोली मतदार संघातील मुख्य रस्त्यांचे फेरडांबरीकरण पंचाहत्तर कोटी रुपये खर्चून हाती घेण्यात आल्याची माहिती पालयेंकर यांनी घरोघरी प्रचारावेळी दिली.
दरम्यान, राज्यातील -गोवा फॉर्वार्डची युती अडीच वर्षापुर्वीच संपुष्टात येताच मंत्रीपदाच्या काळात मार्गी लावलेल्या अनेक विकास कामावर निर्बंध आल्याने तिळारी प्रकल्पाचे काम बराचकाळ रखडले गेले, त्यामुळेच मार्ना शिवोलीतील रस्त्याचे फेरडांबरीकरण बराच काळ रेंगाळले या गोष्टीचा खेद होत असल्याचे पालयेंकर यांनी यावेळी सांगितले.
शिवोलीतील वीज समस्या सोडवण्यासाठी सहा कोटी रुपये खर्चून हणजुण डोंगरमाथ्यावर 33/11केवी क्षमतेच्या उप-वीज केंद्राची उभारणी करण्यात आली असून भुमीगत वीज वाहिन्यांचे कामही हाती घेण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, शापोरा नदीतील सॅण्ड बारची समस्या सोडवण्यासाठी मत्स्योद्योग मंत्री या नात्याने तात्कालीन सहकारी माजी बंदर कप्तान मंत्री जयेश सांळगांवकर यांच्या सहयोगाने सहा कोटीहून अधिक रुपये खर्चून ड्रेझींगचे काम हाती घेत स्थानिक मच्छीमारांना दिलासा देण्यात आला. तथापि, कोवीड महामारीच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षापासुन सर्वच गोष्टींवर निर्बंध आल्याने शिवोलीचा सर्वागीण विकास आणि प्रगती साधण्यासाठी तसेच शिवोली मतदारसंघ अंमली पदार्थ व वेश्या व्यवसाय मुक्त करण्यासाठी स्थानिक मतदारांनी आपल्याला अजून एक संधी द्यावी आणि शिवोलीचा कायापालट घडवून आणण्याच्या कामात सहकार्य करण्याचे आवाहन अपक्ष उमेदवार विनोद पालयेंकर यांनी स्थानिक मतदारांना केले आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar