म्हापसा दि. 28 ( प्रतिनिधी )
गेले दीड वर्ष रोज दिवसागणिक रोज वाढणारे पेट्रोल, डिझेल व गॅस सिलेंडरचे दर निवडणुका जाहीर झाल्यानंतर अचानक थांबले कसे असा प्रश्न गोव्यातील जनतेला पडला आहे, पेट्रोल चे दर शंभर रुपयावर पोहचले आहेत, निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर म्हणजे 10 मार्च नंतर पेट्रोल, डिझेलच्या व गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ सुरू होणार का ?, पेट्रोलचे दर रु.200/- वर पोहचणार आहेत का ? याचे उत्तर गोव्यात भाजपच्या प्रचारासाठी येणाऱ्या गृहमंत्री अमित शहा यांनी द्यावे असे गोवा तृणमूल काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा हळदोणा मतदार संघाचे उमेदवार किरण कांदोळकर यांनी म्हापसा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
या पत्रकार परिषदेत त्यांनी तृणमूल काँग्रेस पक्षाच्या निवडणूक जाहीर नाम्यातील प्रमुख तीन योजनांची माहिती दिली.